सिल्लोड येथे रामगिरी महाराजांचे स्टेटस ठेवल्याने तरुणाला मारहाण

Chhatrapati Sambhajinagar News | पोलीस ठाण्यात जमाव जमल्याने तणाव
Sillod Ramgiri Maharaj status
रामगिरी महाराज यांचे स्टेटस ठेवल्याने वरुड खुर्द येथील एका तरुणाला मारहाण करण्यात आली. Pudhari News Network
Published on
Updated on

सिल्लोड, पुढारी वृत्तसेवा : सरला बेटाचे मठाधिपती रामगिरी महाराज यांचे मोबाईलवर स्टेटस ठेवल्याने तालुक्यातील वरुड खुर्द येथील एका अठ्ठावीस वर्षीय तरुणाला मारहाण करण्यात आली. ही घटना शुक्रवारी (दि. १६) सायंकाळी सातच्या सुमारास शहरात घडली. या प्रकरणी शनिवारी दुपारी शहर पोलिस ठाण्यात सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल आला आहे. (Chhatrapati Sambhajinagar News)

दरम्यान, आज सकाळी शहर पोलिस ठाण्यात मोठा जमाव जमल्याने तणाव निर्माण झाला होता. वरुड खुर्द येथील अठ्ठावीस वर्षीय तरुणाने सरला बेटाचे मठाधिपती रामगिरी महाराज यांचे मोबाईलवर स्टेटस ठेवले होते. ते त्याच्या एका मित्राने पाहिले व त्याला बोलावून महाराजांचे स्टेटस का ठेवले, असे म्हणत सात जणांनी मारहाण केली. (Chhatrapati Sambhajinagar News)

या प्रकरणी आज दुपारी आसिफ साबेर देशमुख याच्यासह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, यावेळी पोलिस ठाण्यात हिंदू संघटना, भाजपचे पदाधिकारी तसेच तरुणांचा मोठा जमाव जमला होता.

Sillod Ramgiri Maharaj status
छत्रपती संभाजीनगर : मोती तांडा येथे खराब रस्त्यामुळे तरुणाचा मृत्यू

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news