Islampur's is now 'Ishwarpur' | ‘इस्लामपूरचे’ झाले ‘ईश्वरपूर’ : शासन निर्णय जाहीर
मंबई : सांगली तालुक्यातील इस्लामपूरचे नाव आता ईश्वरपूर होणार आहे. महाराष्ट्र शासनाने यासंदर्भात परिपत्रक काढून हा निर्णय जाहीर केला आहे. आता सांगली जिल्हयातील वाळवा तालुक्यातील इस्लामपूर या शहराचे नाव ‘ईश्वरपूर’ झाले आहे. तर उरण - इस्लामपूर’ नगरपरिषदेचे नाव आत ‘उरण - ईश्वरपूर’ असे होणार आहे.
शासनाने आज दि. 4 नोव्हेंबर 2025 च्या पत्राद्वारे हा शासन निर्णय जाहीर केला आहे. उपसचिव अनिरुद्ध जेवळीकर यांनी या पत्राद्वारे हा निर्णय घोषित केला. सरकारने एक राजपत्र जारी करून सांगलीतील इस्लामपूरचे नाव आता ईश्वरपूर असे ठेवण्यात आले आहे. असे पत्रात म्हटले आहे. गृह मंत्रालयाने राज्य सरकारचा नावे बदलण्याचा प्रस्ताव स्वीकारल्यानंतर हे करण्यात आले आहे.
नामांतराचा शासकीय प्रवास पूर्ण
राज्य सरकारने शुक्रवार १८ जुलै रोजी इस्लामपूर शहराचे 'ईश्वरपूर' असे नामांतरण करण्याच्या नगरपालिकेच्या प्रस्तावास विधिमंडळात मंजुरी दिली होती आणि तो प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी केंद्र शासनाकडे पाठवला होता. आता, दिनांक १४ ऑक्टोबर रोजी केंद्र शासनाच्या भारतीय सर्वेक्षण विभागाने 'ईश्वरपूर' या नामांतरणास मंजुरी देत तसा शासकीय अध्यादेश काढला आहे. याबरोबरच, भारतीय डाक विभाग आणि भारतीय रेल्वे खात्यालाही त्यांच्या दप्तरी शहराचे नाव बदलण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. आता महाराष्ट्र शासनानेही आपला निर्णय जाहीर करुन नामांतरावर शिक्कामोर्तब केले आहे.

