सांगली
Gopichand Padalkar: संघर्ष अटळ.., पडळकरांचे जयंत पाटलांना थेट आव्हान; काय म्हणाले पाहा Video
भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांना आव्हान दिले आहे.
Gopichand Padalkar:
सांगली: जतच्या राजारामबापू पाटील साखर कारखान्याचं धुराडं यंदा पेटू देणार नाही, असा इशारा भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांना दिला आहे. कारखाना सभासदांच्या मालकीचा झाला पाहिजे, असे पडळकर यांनी म्हटले आहे.
जतची इतकी काळजी आहे तर कारखाना सभासदांना देऊन टाका, नाहीतर मी धुराड पेटू देणार नाही. मोठा संघर्ष करण्याची माझी तयारी आहे. ज्या लोकांनी कारखान्याशी करार केले आहेत, त्यांना आधीच विनंती करतो, तुमचं नुकसान होऊ नये, येथे संघर्ष अटळ आहे, असे थेट आव्हान पडळकर यांनी दिले आहे.