Gopichand Padalkar | विशाल पाटील 2029 मध्ये खासदार नसणार : आ. गोपीचंद पडळकर

मतदारसंघ पुनर्रचनेवर चर्चा
Gopichand Padalkar
Gopichand PadalkarFile Photo
Published on
Updated on

सांगली : खासदार विशाल पाटील 2029 मध्ये पुन्हा खासदार असणार नाहीत, त्यांचा आम्ही करेक्ट कार्यक्रम करू, असे प्रतिपादन आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले. सांगलीत एका कार्यक्रमानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

ते म्हणाले, भविष्यात लोकसभेला आरक्षण पुरुष पडले तर विशाल पाटील यांना आम्ही धडा शिकवू. त्यासाठी मी जिवाचं रान करीन, मेहनत करेन. लोकांमध्ये जाईन, लोकांची कामे करीन. पलूस, कडेगाव, इस्लामपूर व इतर भागात जाऊन लोकांपर्यंत भाजपची भूमिका पटवून देईन. जनता आम्हाला साथ देईल. जिल्हा बँक नोकर भरती प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होणार होता, तो आम्ही थांबवला. एटीएस चौकशीत काही पुरावेही मिळाले आहेत. या संदर्भात लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे. आ. सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली या प्रकरणाचा पाठपुरावा सुरू आहे.

अनेक वर्षे मंत्री राहूनही सांगली ते ईश्वरपूर रस्ता पूर्ण झाला नाही. मोठे उद्योग आणण्यात अपयश आले. आम्ही जतसाठी 2000 एकरमध्ये औद्योगिक प्रकल्पाचा प्रयत्न करत आहोत. शक्तिपीठ महामार्ग झाल्यास कोकण-मुंबई आणि जत यातील अंतर कमी होईल व विकासाचा त्रिकोण तयार होईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news