कुपवाड एमआयडीसीत गोडाऊनला आग

आगीत लाखोचे पॅटर्न खाक; 7 तासानंतर आग आटोक्यात
Sangli Kupwad MIDC News
कुपवाड : येथील वेस्टर्न प्रेसिकास्ट कंपनीच्या गोडाऊनला लागलेली आग.Pudhari Photo
Published on
Updated on

कुपवाड : पुढारी वृत्तसेवा

कुपवाड एमआयडीसीतील वेस्टर्न प्रेसिकास्ट कंपनीमधील पॅटर्न ठेवलेल्या गोडाऊनला रविवारी सकाळी दहाच्या सुमारास अचानक आग लागली. आगीत कास्टींग निर्मितीसाठी तयार करण्यात आलेले लाखो रुपयांचे लाकूड आणि अ‍ॅल्युमिनियमचे पॅटर्न जळून खाक झाले. एमआयडीसी, महापालिकेसह इतर अग्निशमन दलाच्या जवानांनी आणि कंपनीचे कामगार, अधिकार्‍यांनी सलग सात तास शर्थीचे प्रयत्न करीत आग आटोक्यात आणली.

Sangli Kupwad MIDC News
Goa News | मांद्रेतील शूटिंग अकादमीला आग

कुपवाड एमआयडीसीलगत सावळी हद्दीत वेस्टर्न प्रेसिकास्ट कंपनी आहे. या कंपनीत देश आणि विदेशातील विविध कंपन्यांसाठी लागणारे लोखंड आणि स्टीलचे कास्टींग तयार केले जातात. हे कास्टींग तयार करण्यासाठी लागणारे अ‍ॅल्युमिनियम आणि लाकडाचे पॅटर्न (तयार साचे) कंपनीच्या पाठीमागील बाजूस असलेल्या गोडाऊनमध्ये ठेवण्यात आले होते. देश-विदेशातील विविध कंपन्यांकडून मालाची मागणी आल्यानंतर या पॅटर्नमध्ये लोखंड आणि स्टील ओतून कास्टींग तयार केले जात होते.

या गोडाऊनमध्ये सकाळी दहाच्या सुमारास कंपनीच्या पाठीमागील बाजूस असलेल्या गोडाऊनच्या कोपर्‍यात अज्ञात कारणाने अचानक आग लागली. आग पाठीमागील बाजूस कोपर्‍यात लागली असल्याने या घटनेची लवकर कोणाला माहिती मिळाली नाही. त्यामुळे आगीने काही मिनिटांतच रौद्र रूप धारण केले. ही घटना कर्मचारी आणि अधिकार्‍यांना निदर्शनास आली.

Sangli Kupwad MIDC News
Keshavrao Bhosale theater | ... मग नाट्यगृहास आग लागली कशी ?

अधिकारी व कंपनी व्यवस्थापनाने तातडीने अग्निशमन विभागाशी संपर्क साधला. सात तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली. या आगीत गोडाऊनमध्ये ठेवलेले लाखोचे पॅटर्न जळून खाक झाले आहेत. दरम्यान, आग लागलेल्या ठिकाणी सुदैवाने कामगार नसल्याने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या घटनेची नोंद रात्री उशिरापर्यंत कुपवाड पोलिस ठाण्यात झाली नव्हती.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news