‘रयत’कडून डॉ. कदम कॉलेजला 50 लाखांचा निधी

जे. के. बापू जाधव : डॉ. विश्वजित कदमांकडून रयत संस्थेला 1 कोटींची देणगी
50 Lakh Donet To Kadam Collge
रामानंदनगर : येथील महाविद्यालयात जे. के. जाधव यांना 50 लाख रुपयांचा धनादेश देताना सचिव विकास देशमुख.Pudhari Photo

पलूस, पुढारी वृत्तसेवा : रयत शिक्षण संस्थेच्या डॉ. पतंगराव कदम महाविद्यालय रामानंदनगरला रयत शिक्षण संस्थेकडून 50 लाख रुपयांचा निधी देण्यात आला. नॅक पुनर्मूल्यांकनाच्या अनुषंगाने भौतिक व शैक्षणिक सुविधा निर्माण करून चांगली ग्रेड प्राप्त करण्यासाठी हा निधी देण्यात आला आहे.

महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन व माजी राज्यमंत्री आमदार डॉ. विश्वजित कदम, रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महेंद्र लाड, मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य जे. के. (बापू) जाधव यांच्या विशेष प्रयत्नाने डॉ. पतंगराव कदम पन्नास लाखांचा निधी देण्यात आला. महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी रयत शिक्षण संस्थेला एक कोटी रुपयांची देणगी देण्यात आली होती. याच देणगीमधून 50 लाखांचा धनादेश रयत शिक्षण संस्थेचे सचिव विकास देशमुख यांनी जे के (बापू) जाधव व प्र. प्राचार्या डॉ. यु. व्ही. पाटील यांच्याकडे सुपूर्त केला. यावेळी देशमुख चेक प्रदान करताना म्हणाले, की महाविद्यालयाने आपला ‘अ’ मानांकन दर्जा सिद्ध केलेला आहे, यापुढेही त्यांनी ‘अ’ मानांकन प्राप्त करावे यासाठी शुभेच्छा ही दिल्या.

50 Lakh Donet To Kadam Collge
वैभववाडीसाठी 13 कोटी 62 लाखांचा निधी प्राप्त

यावेळी चंद्रकांत दळवी, विकास देशमुख, के. बी. पी. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ज्ञानदेव मस्के, ऑडिटर शिवलिंग मेनकुदळे, माध्यमिक सहसचिव बी. एन. पवार, सहाय्यक विभागीय अधिकारी अँथनी डिसोजा, प्राचार्य डॉ. राजेंद्र मोरे महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व इतर मान्यवर उपस्थित होते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news