वैभववाडीसाठी 13 कोटी 62 लाखांचा निधी प्राप्त

आ. राणेंच्या माध्यमातून भविष्यात शहराचे रूपडे बदलणार : डॉ.राजेंद्र पाताडे
13 crore 62 lakhs received for Vaibhavwadi
पत्रकार परिषदेत बोलताना डॉ.राजेंद्र पाताडे. सोबत भाजप पदाधिकारी.Pudhari Photo
Published on
Updated on

वैभववाडी, पुढारी वृत्तसेवा : वैभववाडी शहराच्या विकासासाठी आ. नितेश राणे यांच्या प्रयत्नातून गेल्या दोन वर्षांत 13 कोटी 62 लाखांचा निधी प्राप्त झाला आहे. येत्या दोन वर्षांत वैभववाडी शहरातील पायाभूत सुविधांबरोबर शहाराचा शाश्वत विकास करण्यात येणार आहे. यातून भविष्यात वैभववाडी शहराचे रूपडे बदलणार आहे, अशी माहिती भाजपचे नगरपंचायत प्रवक्ते डॉ. राजेंद्र पाताडे यांनी दिली.

वाभवे-वैभववाडीच्या वतीने वैभववाडी शहरातील सुरू असलेल्या विविध विकासकामांची माहिती नागरिकांना मिळावी यासाठी महालक्ष्मी हॉटेल येथे पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी नगराध्यक्षा नेहा माईणकर, उपनगराध्य संजय सावंत, नगरसेवक राजन तांबे, प्रदीप रावराणे, सुभाष रावराणे, सुप्रिया तांबे, यामिनी वळवी, श्रीमती संगीता चव्हाण आदी उपस्थित होते.

13 crore 62 lakhs received for Vaibhavwadi
कोल्हापूर-वैभववाडी मार्गाची प्रक्रिया सुरू

गेल्या दोन वर्षांत शहरात राबविण्यात आलेल्या विविध विकासकामांची माहिती प्रोजेक्टवर दाखवत त्याबाबत डॉ. पाताडे यांनी माहिती दिली. शहरात जवळपास 25 विकासकामे पूर्ण करण्यात आली आहेत.यामध्ये शहरातील बंदिस्त गटारे, रस्त्याला संरक्षक भिंत बांधणे, मोरी बांधकाम करणे, कॉलेज रोड तयार करणे, रस्ता डांबरीकरण करणे, रस्ता दुतर्फा साफसफाई करणे, रेडिमेड शौचालय सुविधा उपलब्ध करून देणे, फूटपाथ बांधणे, गणपती विसर्जन घाट सुशोभिकरण करणे, काँक्रिटीकरण रस्ता तयार करणे, शहरात सीसीटीव्ही बसवणे, बेस रोड सिस्टीम तयार करणे, इनडोअर टर्फ ग्राउंड बनविणे, ड्रेनेज व सांडपाण्याचे नियोजन करणे आदी कामाचा समावेश आहे. तर आचारसंहितेमुळे काही मंजूर कामे रखडली आहेत. ती आचारसंहिता संपताच मार्गी लागतील असे आश्वासनही डॉ. पाताडे यांनी दिले.

13 crore 62 lakhs received for Vaibhavwadi
मोठा निर्णय! वैभववाडी-कोल्हापूर रेल्वे मार्गाची पीएम गतीशक्ती अंतर्गत शिफारस

वैभववाडीत येणार्‍या पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी व शहर सुशोभीत करण्यासाठी संभाजी चौकाचे सुशोभिकरण करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे शहाराच्या प्रवेशद्वारावर डिजिटल स्वागत कमानी बसवण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे न. पं. साठी सुसज्ज असे न.पं. कार्यालय बनविण्याचा मानस असून त्यासाठी आराखडा तयार करण्यात आला आहे.

चार दिवसांत गटारे साफ

वैभववाडी शहरात सध्या खोदून ठेवलेल्या गटारामुळे शहरातील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यातील पाण्याचा निचरा येत्या चार दिवसांत करण्यात प्रयत्न करू, असे आश्वासन उपनगराध्य संजय सावंत यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना दिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news