सांगली : उसाला पहिली उचल 3,100 रुपये जाहीर

सांगली : उसाला पहिली उचल 3,100 रुपये जाहीर

Published on

कडेगाव; पुढारी वृत्तसेवा : चालू गळीत हंगामातील उसाला पहिली उचल प्रतिटन 3 हजार 100 रुपये देण्याचा निर्णय जिल्ह्यातील साखर कारखानदारांच्या बैठकीत घेण्यात आला, अशी माहिती माजी मंत्री आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी पत्रकारांना दिली; मात्र स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी कारखानदारांनी घेतलेला हा निर्णय अमान्य असल्याचे सांगितले. कोल्हापूर पॅटर्नप्रमाणे सांगली जिल्ह्यात दर द्यावा, अशी मागणी संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी केली.

कडेगाव येथे डॉ. पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखान्याचे संचालक आमदार डॉ. विश्वजित कदम यांच्या पुढाकाराने आयोजित कारखानदारांच्या बैठकीत हा दर देण्याचा निर्णय सर्वानुमते झाला. या बैठकीला खासदार संजय पाटील, क्रांती कारखान्याचे माजी अध्यक्ष आमदार अरुण लाड, आमदार मानसिंगराव नाईक, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, उदगिरी शुगरचे उत्तमराव पाटील, युवा नेते विशाल पाटील, राजारामबापू कारखान्याचे उपाध्यक्ष विजय पाटील, दत्त इंडियाचे मृत्यूजंय शिंदे, हुतात्मा कारखान्याचे अध्यक्ष वैभव नायकवडी आदी उपस्थित होते.

यावेळी आमदार डॉ.विश्वजित कदम म्हणाले, ज्या साखर कारखान्यांनी मागिल वर्षी ऊस पुरवठादार शेतकर्‍यांना प्रतिटन रुपये 2 हजार 900 पेक्षा जादा ऊसदर अदा केलेला आहे. त्यांनी प्रतिटन 50 रुपये व 2 हजार 900 पेक्षा कमी दर अदा केलेल्या कारखान्यांनी मागील वर्षाच्या एफआरपी दरापेक्षा किमान रुपये 100 रुपये जादा दर अदा करण्यासंदर्भात शासनाकडे प्रस्ताव दाखल करुन मंजुरी प्राप्त झाल्यानंतर ही रक्कम शेतकर्‍यांना देण्याचा निर्णय यावेळी सर्वानुमते घेण्यात आला.

कोल्हापूर पॅटर्नची मागणी

कडेगाव येथे साखर कारखानदारांची बैठक झाल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे व कार्याध्यक्ष संदीप राजोबा यांच्यासह संघटनेच्या प्रतिनिधींनी साखर कारखानदारांच्या बैठकीतील निर्णय अमान्य असल्याचे सांगितले. कोल्हापूर पॅटर्नप्रमाणे कारखानदारांनी एफआरपी अधिक शंभर रुपये चालू वर्षीचा ऊस दर जाहीर करावा, अशी मागणी केली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news