Jayant Patil: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट ईश्वरपूर नगराध्यक्ष अपात्रतेसंबंधी

आमदार जयंत पाटील; वेगळे तर्क लावण्याची गरज नाही
Jayant Patil: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट ईश्वरपूर नगराध्यक्ष अपात्रतेसंबंधी
Published on
Updated on

ईश्वरपूर : ईश्वरपूरचे लोकनियुक्त नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे व त्यांचे बंधू नगरसेवक सुनील मलगुंडे यांचे कुठले तरी जुने अतिक्रमणाचे प्रकरण पुढे करून त्यांचे नगराध्यक्ष पद व नगरसेवक पद जिल्हाधिकाऱ्यांनी रद्द ठरवले आहे. या निर्णयाबाबत गुरुवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीचे वेगळे तर्क काढले जाऊ नयेत, असे स्पष्टीकरण राष्ट्रवादीचे नेते आ. जयंत पाटील यांनी दिले आहेत.

आ. जयंत पाटील म्हणाले, नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे व नगरसेवक सुनील मलगुंडे यांच्यासमवेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही याच कारणासाठी भेट घेतली होती. ईश्वरपूर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे हे ७ हजार २०० मतांनी निवडून येत लोकनियुक्त नगराध्यक्ष झाले आहेत.

नगराध्यक्ष म्हणून काम करीत असताना त्यांनी उरूण-ईश्वरपूर शहरातील अनेक विधायक कामांना गती देण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र लोकनियुक्त नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे व त्यांचे बंधू नगरसेवक सुनील मलगुंडे यांचे कुठले तरी जुने अतिक्रमणाचे प्रकरण पुढे करून त्यांचे नगराध्यक्ष पद व नगरसेवक पद रद्द ठरवले गेले आहे.

या निर्णयाबाबत आनंदराव मलगुंडे व सुनील मलगुंडे यांच्यासमवेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. या भेटीमध्ये कोणतीही राजकीय चर्चा झालेली नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news