Dr Smita Jadhav| 'पदवीधरांचे प्रलंबित प्रश्न सोडविणार'

डॉ. स्मिता जाधव : सांगली जिल्ह्यात पदवीधर निवडणुकीच्या प्रचारार्थ मेळावे
Dr Smita Jadhav
शिराळा येथे महायुतीच्या मेळाव्यात भाजपच्या उमेदवार डॉ. स्मिता जाधव, आ. सत्यजित देशमुख, जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, सरचिटणीस शरद लाड, जयराज पाटील, नगराध्यक्ष पृथ्वीसिंग नाईक, हणमंतराव पाटील, के. डी. पाटील, तेजस्वी दुर्गे यांच्यासह महायुतीचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.Pudhari photo
Published on: 
Updated on: 

सांगली : पदवीधरांच्या प्रलंबित प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी मी निवडणुक रिंगणात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे पदवीधर मतदारसंघात स्त्रीशक्तीला संधी दिली आहे. कौशल्य विकासाला चालना देणे, उद्योगांसाठी आवश्यक प्रशिक्षण व इन्क्युबेशन केंद्रे उभारणे, तसेच स्पर्धा परीक्षा व करिअर मार्गदर्शन केंद्रे सुरू करण्यासाठी मी कटिबद्ध असेन, असे प्रतिपादन पुणे पदवीधर मतदारसंघातील भाजप-महायुतीच्या उमेदवार डॉ. स्मिता योगेश जाधव यांनी केले.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातील. शिराळा, ईश्वरपूर, पेठ, आष्टा, कवठेमहांकाळ येथे झालेल्या प्रचार सभा व मेळाव्यांमध्ये त्या बोलत होत्या. यावेळी भाजपचे नेते शरद लाड यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

माहेरच्या लेकीसाठी एकजूट

शिराळा येथील सह्याद्री सहकारी खरेदी-विक्री संघात आयोजित प्रचार बैठकीत आमदार सत्यजित देशमुख म्हणाले, डॉ. स्मिता जाधव या आपल्या शिराळ्याच्या लेक असून या माहेरच्या बहिणीला भरघोस मतांनी विजयाचा गुलाल लावण्यासाठी शिराळा तालुक्यातील जनतेने एकजुटीने प्रयत्न करावेत. यावेळी मुंबईचे आमदार राजनभाई नाईक, भाजप जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, सरचिटणीस शरद लाड, नगराध्यक्ष पृथ्वीसिंग नाईक यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. डॉ. स्मिता जाधव यांनी शिराळा येथील 'यशवंत उद्योग समूहा'ला भेट दिली. माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी त्यांना पाठिंबा व्यक्त केला.

Dr Smita Jadhav
Shivendraraje Bhosale : ना. शिवेंद्रराजेंच्यामुळे 'एमपीएससी' आंदोलनावर तोडगा

पेठ येथे विजयाचा निर्धार

पेठ (ता. वाळवा) येथील महाडिक शिक्षण संकुलात पुणे पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवार डॉ. स्मिता जाधव व शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार कौस्तुभ गावडे यांच्या प्रचारार्थ भव्य मेळावा पार पडला. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक आणि जिल्हा बँकेचे संचालक राहुल महाडिक यांनी शिराळा व वाळवा तालुक्यातून महायुतीच्या उमेदवारांना मताधिक्य देण्याचा निर्धार व्यक्त केला.

Dr Smita Jadhav
Rising Food Prices : तांदूळ वीस रूपयांनी तर डाळी दहा रूपयांनी महाग

आष्ट्यात संत ज्ञानेश्वर शिक्षण संकुलास भेट

आष्टा येथील संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेच्या संकुलास भेट दिल्यानंतर आयोजित कार्यक्रमात अॅड. राजेंद्र (चिमण) डांगे यांनी, या निवडणुकीत डॉ. स्मिता जाधव यांचा विजय निश्चित असल्याचे सांगितले.

कवठेमहांकाळमध्ये विकासाचा रोडमॅप सादर

कवठेमहांकाळ येथे अंबिका शिक्षण संस्थेच्या वतीने आयोजित बैठकीत डॉ. जाधव यांनी, प्रत्येक तालुक्यात एआय डिजिटल लॅब, कौशल्य विकास केंद्रे आणि एमपीएससी-यूपीएससीसाठी प्रशिक्षण केंद्रे उभारण्याच्या 'नऊ वचनांचा संकल्प' जनतेसमोर मांडला. यावेळी भाजप तालुकाध्यक्ष उदयराजे भोसले, वैभव गुरव यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news