कंडक्टरवर चुकीचे उपचार; डॉक्टरला साडेअकरा लाखांची भरपाई देण्याचे आदेश

Sangli News | चुकीच्या उपचाराबद्दल ग्राहक न्यायालयाचा दणका
doctor fined for malpractice in kumbharewadi
डॉ. प्रकाश मकामले (रा. कुंभारेवाडी, येळापूर, ता. शिराळा) यांना ११ लाख ६० हजारांची भरपाई देण्याचे आदेश File Photo
Published on
Updated on

सांगली : पुढारी वृत्तसेवा : चुकीचा व अघोरी उपचार करून एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याबद्दल तथाकथित डॉ. प्रकाश बाळू मकामले (रा. कुंभारेवाडी, येळापूर, ता. शिराळा) याने रुग्णाच्या वारसांना ११ लाख ६० हजारांची भरपाई देण्याचे आदेश सांगली येथील ग्राहक न्यायालयाने दिले. तसेच त्याच्याविरुध्द फिर्याद नोंदवून कारवाई करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले. न्यायाधीश प्रमोद गोकुळ गिरि गोस्वामी यांच्या अध्यक्षतेखाली मनीषा वनमोरे यांच्या पीठाने हा निर्णय दिला.

ग्राहक न्यायालयाचा दणका 

वैद्यकीय व्यवसाय करण्याचा परवाना नसताना मखमले याने अघोरी उपचार केल्याचे न्यायालयात सिद्ध झाले. रुग्णाच्या वारसांना औषधोपचार व इतर खर्चापोटी ११ लाख रुपये ३० दिवसांत द्यावेत, जिल्हा पोलीस अधीक्षक व पोलीस निरीक्षक शिराळा यांनी तत्काळ फिर्याद नोंदवून कायदेशीर कारवाई करावी, जिल्हाधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी प्रकाश मकामले याचा वैद्यकीय परवाना व पदवीबाबत १५ दिवसांत न्यायालयात अहवाल द्यावा व योग्य कारवाई करावी, शारीरिक व मानसिक त्रासापोटी ५० हजार रुपये आणि अर्जाचा खर्च म्हणून १० हजार रुपये मकामले याने मृत व्यक्तीच्या वारसांना देण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

महादेव माळी एस. टी. महामंडळामध्ये नोकरीला  

याबाबत जालिंदर महादेव माळी हे १९८७ पासून एस. टी. महामंडळामध्ये वाहक म्हणून काम करीत होते. २०२१ पासून त्यांना संधिवात व मणक्याचा आजार सुरू झाला. सन २०२२ मध्ये त्यांच्या वाचनामध्ये एक जाहिरात आली. त्यानुसार दि.१० जुलै २०२२ रोजी ते प्रकाश किरण आयुर्वेदिक व अॅक्युप्रेशर केंद्र, कुंभारेवाडी, शिराळा येथे गेले. तेथे त्यांनी ५०० रुपयांचा खर्च केस पेपरसाठी व इतर खर्च म्हणून २५० रुपये भरले.

२५ मिनिटांच्या उपचारामध्ये माळी अस्वस्थ

तथाकथित डॉ. मकामले याने त्याच्याकडील कपडे माळी यांना घालण्यास दिले व बायो हेल्थ या उपकरणावर झोपण्यास सांगितले. आणि ते उपकरण सुरू करण्याचे बटन दाबले. या २५ मिनिटांच्या उपचारामध्ये माळी यांना अस्वस्थ वाटू लागले. व ते जोरजोरात ओरडू लागले. १० नोव्हेंबर २०२२ रोजी तेथे गेले. या उपचारावेळीही त्यांना त्रास होत होता. घरी गेल्यानंतर त्यांना जास्तच अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर मकामले याने माळी यांच्या घरी जाऊन दोन इंजेक्शन दिले.

माळी यांची प्रकृती खालावली

माळी यांची प्रकृती खालावली. त्यांच्यावर सांगली, कोल्हापूर व मिरज येथील विविध दवाखान्यांमध्ये उपचार केले. परंतु त्यांचा मृत्यू झाला. माळी यांच्या कुटुंबीयांच्यावतीने सांगली येथील ग्राहक न्यायालयामध्ये अॅड. आर. बी. पाटील व अॅड. पी. बी. पाटील यांच्यामार्फत तक्रार दाखल केली. प्रकाश मकामले हा डॉक्टर नसल्याचे तसेच त्याने चुकीचे उपचार केल्याचे न्यायालयात सिद्ध झाले.

doctor fined for malpractice in kumbharewadi
सांगली : जरांगेंच्या आंदोलनाचे शरद पवार पहिले राजकीय बळी

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news