पुढारी ऑनलाईन डेस्क : आजकाल हवामान बदलाबाबत जागरूकता खूप वाढली आहे. पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी लोक अनोखे उपाय शोधत आहेत. पृथ्वीचे तापमान जसजसे वाढत आहे, तसेच लोकांना झाडांचे महत्त्व समजू लागले आहे. दरम्यान, पर्यावरणीय शाश्वततेच्या दिशेने एक अग्रगण्य वाटचाल करताना भारतीय प्रशासकिय अधिकारी शुभम गुप्ता यांनी एका हरित उपक्रमाची सुरुवात केली आहे. ज्याकडे सर्वत्र लक्ष वेधले जात आहे.
जिल्हाधिकारी शुभम गुप्ता भारतीय प्रशासकिय सेवा (IAS) अधिकारी आणि महाराष्ट्रातील सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेचे महापालिका आयुक्त, यांनी सोशल मीडियावर खास व्हिजिटिंग कार्डचे छायाचित्र शेअर केले आहे. शुभम गुप्ता यांनी पोस्टवर लिहिले, "आता जो कोणी माझ्या कार्यालयात येईल, त्याला चित्रात दिसणारे व्हिजिटिंग कार्ड मिळेल. हे व्हिजिटिंग कार्ड जमिनात रोवल्यानंतर त्याचे एका सुंदर झेंडूच्या रोपात रूपांतर होऊ शकते."
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वरुन गुप्ता यांनी त्यांच्या नाविन्यपूर्ण व्हिजिटिंग कार्ड्सच्या प्रतिमा शेअर केल्या. ज्यांने देशभरातील नेटिझन्सचे लक्ष वेधून घेतले. पारंपारिक कार्ड्सच्या विपरीत, हे इको-फ्रेंडली पर्याय झेंडूच्या रोपांच्या बियांसह एकत्रित केलेले आहेत, ज्यामुळे त्यांची लागवड करता येणे शक्य आहे. आयएएस अधिकाऱ्याने ही माहिती शेअर केल्यानंतर यूजर्स त्यांचे खूप कौतुक करत आहेत. एका वापरकर्त्याने लिहिले, "ही एक उत्तम कल्पना आहे."
हेही वाचा :