

CM Devendra Fadnavis on Drug Case Action Police
सांगली: अंमली पदार्थाच्या कनेक्शनमध्ये पोलीस आढळून आल्यास आता निलंबन नाही. तर थेट सेवेतून बडतर्फ करण्यात येईल, असा गर्भित इशारा देत राज्यात अंमली पदार्थ झिरो टॉलरन्स मोहीम राबिण्यात येणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (दि.२३) सांगलीत केली. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या इमारतीचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार विशाल पाटील, आमदार जयंत पाटील, आमदार विश्वजित कदम, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सुरेश खाडे आदी उपस्थित होते.
देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, राज्यात जवळपास दोन लाख पोलीस आहेत. पण त्यांच्या निवासस्थानाची संख्या अत्यंत कमी होती. त्यामुळे गेल्या दहा वर्षांत महाराष्ट्रात सातत्याने प्रयत्न करून गृहनिर्माण योजनेचे काम पूर्ण केले आहे. ९४ हजार घरे राज्यात तयार करण्यात आली आहेत. राज्यात पूर्वी पोलीस राहत असणाऱ्या ठिकाणी आंघोळीची देखील सोय नव्हती. आता अतिशय चांगल्या प्रतीचे बांधकाम असलेली घरे करण्यात आलेला आहे.