विटा : पुढारी वृत्तसेवा : खानापूर विधानसभा मतदारसंघातून संजय विभूते यांची दावेदारी पक्की आहे. मात्र, पक्षाने खासकरून उद्धव ठाकरे यांनी जर मला आदेश दिला. तर आपणही तयार आहोत, अशी प्रतिक्रिया डबल महाराष्ट्र केसरी पै. चंद्रहार पाटील यांनी दिली आहे. (Chandrahar Patil)
शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. दरम्यान, सांगली जिल्ह्यातील विधानसभा जागांचे वाटप निश्चित झाल्याच्या चर्चा आहेत. तिन्ही पक्षातील वरिष्ठ नेत्यांची चर्चा झाली असून खानापूर, आटपाडी व मिरज मतदारसंघ उबाठा शिवसेनेच्या वाट्याला गेल्या ची माहिती आहे. खानापूर आटपाडी मतदार संघातून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय विभूते तर मिरजमधून प्राध्यापक सिद्धार्थ जाधव किंवा तानाजी सातपुते यांच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब करून तसा ठराव जिल्हा कार्यकारिणीने वरिष्ठांकडे पाठवला आहे. (Chandrahar Patil )
या मतदारसंघातून डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांच्या नावाची चर्चा जरी होत असली तरी ते लोकसभेची निवडणूक झाल्यामुळे लगेच विधानसभेला इच्छुक नाहीत असे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय विभुते यांनी मतदारसंघांमध्ये गेल्या पंधरा वर्षापासून ताकदीने संघटनात्मक काम केले आहे. त्यांनी खानापूर तालुका प्रमुख म्हणून १५ वर्ष, तर आता जिल्हाप्रमुख म्हणून गेली ७ वर्ष उत्तम प्रकारे काम करत आहेत. (Chandrahar Patil )
कोरोना काळात सुद्धा त्यांनी खानापूर आटपाडी मतदारसंघासह संपूर्ण जिल्ह्यात भरीव योगदान दिले आहे. ते उद्धव ठाकरे यांचे विश्वासू तसेच ओबीसी चेहरा म्हणून पुढे येत आहे. मात्र, याबाबत चंद्रहार पाटील यांना विचारले असता, ते म्हणाले, पक्षाने खास करून उद्धव ठाकरे यांनी जर मला आदेश दिला, तर आपणही तयार आहोत.