तासगाव : पुढारी वृत्तसेवा : माजी गृहमंत्री आर आर आबा पाटील यांचे सुपुत्र रोहित पाटील यांचा आज २५ वा वाढदिवस असून सकाळपासूनच अंजनी येथील निवासस्थानी त्यांच्यावर जिल्ह्यासह राज्यातील नेते पदाधिकारी, कार्यकर्त्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव सुरु आहे. दरम्यान सकाळ पासूनच पाऊस सुरु असतानाही रोहित पाटील यांना शुभेच्छा देण्यासाठी पडत्या पावसातही वृध्द, तरुण, युवा व महिला वर्गाची झुंबड उडाली असल्याचे चित्र अंजनी गावामध्ये पहायला मिळत आहे.
आज पहाटे रोहित दादा पाटील यांनी कोल्हापूर येथे जोतिबाचे दर्शन घेतले. यानंतर सकाळी दहा वाजलेपासून ते अंजनी येथे शुभेच्छा स्वीकारत आहेत. दरम्यान दुपारनंतर पावसाला सुरुवात झाली, परंतू पडत्या पावसातही शुभेच्छा देण्यासाठी शेकडो पदाधिकारी कार्यकर्ते अंजनी येथे येत आहेत. निवासस्थानाच्या समोर उभारलेल्या मंडपात ते शुभेच्छा स्वीकारत आहेत. पावसाच्या धारातही शुभेच्या देण्यासाठी येणा-या कार्यकर्त्यांची गर्दी कांही केल्या हटायला तयार नाही.