Atpadi Taluka gram panchayat reservation
आटपाडी तालुक्यातील 53 ग्रामपंचायतचे आरक्षण जाहीरfile photo

Gram panchayat reservation: आटपाडी तालुक्यातील 53 ग्रामपंचायतचे आरक्षण जाहीर

33 गावात सर्वसाधारण आरक्षण , 27 ठिकाणी पुरुष तर 26 ठिकाणी महिलाराज
Published on

Atpadi Taluka gram panchayat reservation

आटपाडी : आटपाडी तालुक्यात एकूण 53 ग्रामपंचायती साठी सरपंचपदाची आरक्षण सोडत आज तहसीलदार सागर ढवळे आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत काढण्यात आली.17 गावात सर्वसाधारण तर 16 गावात स्त्री सर्वसाधारण आरक्षण पडले.

आटपाडी तालुक्यातील मानेवाडी, बाळेवाडी, पारेकरवाडी या गावात अनुसूचित जातीसाठी आरक्षण पडले आहे. लेंगरेवाडी,देशमुखवाडी आणि चिंचाळे अनुसूचित जातीसाठी स्त्री आरक्षण पडले आहे.तर खांजोडवाडी,कुरुंदवाडी, मुढेवाडी, बोंबेवाडी, पिंपरी बुद्रुक,उंबरगाव,बनपुरी गावांत नागरिकांचा मागास प्रवर्ग अर्थात ओबीसी आरक्षण पडले आहे. याच प्रवर्गात कानकात्रेवाडी, वाक्षेवाडी, य.पा.वाडी,तडवळे,तळेवाडी पुजारवाडी (दिघंची) आणि हिवतड या गावात स्त्री राखीव आरक्षण पडले आहे.

Atpadi Taluka gram panchayat reservation
महाबळेश्वरचे वैभव असलेले विल्सन पॉईंट दुर्लक्षित

औटेवाडी, धावडवाडी,माळेवाडी,मासाळवाडी,पळसखेल,पिंपरी खु.,जांभुळणी, गळवेवाडी,विभुतवाडी, आवळाई, राजेवाडी,विठलापुर,झरे,निंबवडे खरसुंडी, घरनिंकी सर्वसाधारण स्त्री साठी तर पडळकरवाडी,मिटकी, पात्रेवाडी,आंबेवाडी,कामथ, काळेवाडी,पुजारवाडी (आ.),घाणंद, वलवण, माडगुळे,लिंगीवरे, कौठुळी,गोमेवाडी, नेलकरंजी, शेटफळे, करगणी आणि दिघंची सर्वसाधारण खुला गटासाठी सुटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news