Pudhari Career Guidance Seminar: बारावीनंतर काय करायचे? दैनिक ‘पुढारी’तर्फे उद्या सेमिनार

'पुढारी कॅम्पस टू करिअर'मध्ये मिळणार तज्ज्ञांचे मोफत मार्गदर्शन
Career Guidance
Career GuidancePudhari
Published on
Updated on

सांगली : सीईटी, कॅप राऊंडबाबत तज्ज्ञांचे मार्गदर्शन, ॲडमिशन प्रोसेसची संपूर्ण माहिती, टॉप कोर्सेसबाबत माहिती, करिअरच्या विविध संधींबाबत सविस्तर माहिती, स्कॉलरशिप व शैक्षणिक कर्ज मार्गदर्शन, तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून थेट कौंसिलिंग... याबाबतची सारी माहिती एकाच दिवशी, एकाच ठिकाणी मिळण्याची संधी दैनिक ‘पुढारी’च्यावतीने आयोजित पुढारी कॅम्पस टू करिअर या सेमिनारमुळे विद्यार्थी व पालकांना मिळणार आहे.

उद्या, दि. १४ रोजी दुपारी ३ वाजता रजपूत शैक्षणिक संकुल, व्हाईट हाऊस, गुलमोहर कॉलनी, रिलायन्स मार्केटसमोर, सांगली येथे हा सेमिनार होणार आहे. बारावीचा महत्त्वाचा टप्पा पार केल्यानंतरच खऱ्याअर्थाने करिअरला दिशा मिळत असते. या वळणावर विद्यार्थ्यांना हव्या असलेल्या करिअरविषयक मार्गदर्शनासाठी दैनिक पुढारीच्यावतीने पुढारी कॅम्पस टू करिअर या अत्यंत महत्त्वाच्या सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांसाठी आयोजित हा सेमिनार अगदी मोफत आहे. या उपक्रमासाठी पूर्वनोंदणी अनिवार्य असून, कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे. माहितीसोबत सेमिनारमध्ये सहभागी झालेल्या निवडक विद्यार्थ्यांना तीन विद्यापीठांना भेट देण्याची संधीही मिळणार आहे.

लाभ घेण्याचे आवाहन

अभियांत्रिकी, वैद्यकीय, बी. फार्मसी, व्यवस्थापन, तसेच इतर सर्व अभ्यासक्रमांसाठी असलेली संपूर्ण प्रवेश प्रक्रिया सोप्या भाषेत समजावून सांगितली जाणार असल्याने विद्यार्थ्यांनी या सेमिनारचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. करिअरबाबत अनेक प्रश्नांची उत्तरे विद्यार्थी व पालकांना या सेमिनारमध्ये मिळणार आहेत. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना योग्य निर्णय घेण्यास मदत होणार आहे.

महत्त्वाची संधी...

प्रवेश पूर्णपणे विनामूल्य. या उपक्रमासाठी पूर्वनोंदणी अनिवार्य. सोप्या भाषेत तज्ज्ञांचे मार्गदर्शन. प्रवेश प्रक्रिया ते कॉलेज निवडीपर्यंत संपूर्ण माहिती. शिष्यवृत्ती व शैक्षणिक कर्ज प्रक्रियेचे मार्गदर्शन. निवडक विद्यार्थ्यांना तीन नामांकित विद्यापीठांना भेट देण्याची संधी. अधिक माहितीसाठी संपर्क : 95700 17003

सांगलीमध्ये सेमिनार

केव्हा – रविवार, १४ जून २६

कुठे – रजपूत शैक्षणिक संकुल, व्हाईट हाऊस, गुलमोहर कॉलनी, रिलायन्स मार्केटसमोर, सांगली.

या उपक्रमासाठी पूर्वनोंदणी अनिवार्य आहे.

वेळ – दुपारी ३ वाजता.

सांगलीत तज्ज्ञांचे मार्गदर्शन

११ ते ११.२० - डॉ. साची जैन

११.२० ते ११.४०- मुकेश अगरवाल

११.४० ते १२ - शंतनू देशपांडे

१२ ते १२.२० - अजित गट्टे

१२.२० ते १२.४०- डॉ. स्वप्निल सोनकांबळे/ डॉ. मिलिंद ओव्हाळ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news