

जत: पुढारी वृत्तसेवा धुळकरवाडी (ता.जत) येथे एकाने ऊसतोडीची उचल किती पाहिजे असा फोन करत असताना भलत्याच व्यक्तीला फोन लागला. या रागातून एका गटाने आम्हाला कशाला ऊस तोडी उचल हवी आहे असा जाब विचारत गैरसमजूतीतून सातजणावर कोयता, कुऱ्हाड, लोखंडी गजाने हल्ला केला. यात अकाराम कृष्णा करे (रा.धुळकरवाडी) गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी खुनी हल्ला केल्याबाबत निलाबाई रामा माने यांनी उमदी पोलिसात फिर्याद दाखल केली आहे. ही घटना (सोमवार) सकाळी ११ वाजता कागणरी येथील मेडीदार यांच्या अंगणात घडली.
खुनी हल्ला केल्याप्रकरणी सुरेश धोंडीबा करे, उमेश सुरेश करे, संतोष शिवाजी करे, बबन नारायण करे, सुनील सुरेश करे, भाऊसाहेब नारायण करे, रमेश सुरेश करे या सातजणांवर गुन्हा दाखल झाला आहे.
संशयित आरोपीने केलेल्या खुनी हल्ल्यात आकाराम कृष्णा करे, दादू कृष्णा करे, परमेश्वर कृष्णा करे, गणपती कामांना करे , उजया जयाप्पा पांढरे, संजय रामा माने, बिराप्पा जायप्पा पांढरे (सर्व रा. धुळकरवाडी) हे सातजण गंभीर जखमी झाले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी, धुळकरवाडी येथील आकाराम करे व त्यांच्या सहकाऱ्यांचा ऊस टोळीचा व्यवसाय आहे. सोमवारी सकाळी कागणरी येथील मेडीदार नामक व्यक्तीच्या घरासमोर होते. त्यावेळी त्यांनी सुरेश लमाण या व्यक्तीस ऊसतोडी उचल हवी आहे का असा कॉल करणार होते .परंतु हा कॉल चुकून संशयित आरोपी गटातील रमेश सुरेश करे यांना लागला. आम्हाला कशाला ऊस तोडीची उचल हवी आहे असा जाब विचारात कागणरी येथील मेडीदार यांच्या घरासमोर सुरेश करे यांनी व त्यांच्यासोबत आलेल्या सहा जणांनी आकाराम करे यांच्यावर कुऱ्हाड, लोखंडी गजाने खुनी हल्ला केला .यात त्यांचा पाय फ्रॅक्चर झाला आहे त्यांनी त्यांच्या घरातीलच काही व्यक्तींना फोन करून घटनास्थळी बोलवून घेतले. यावेळी त्यांना देखील संशयित आरोपी यांच्याकडून गंभीर हल्ला करण्यात आला. या घटनेची उमदी पोलिसात नोंद असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण खरात करत आहेत.
हेही वाचा :