सांगली : विश्‍वास साखर कारखान्याची निवडणूक सलग पाचव्यांदा बिनविरोध  | पुढारी

सांगली : विश्‍वास साखर कारखान्याची निवडणूक सलग पाचव्यांदा बिनविरोध 

शिराळा : पुढारी वृत्तसेवा

शिराळा व शाहुवाडी कार्यक्षेत्र असलेल्या विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखान्याची सलग पाचव्यांदा बिनविरोध निवडणूक झाली आहे.

नूतन संचालक मंडळ असे :

विराज मानसिंगराव नाईक (चिखली), बाबासो केशव पाटील (सागाव), सुरेश पांडुरंग पाटील (मांगले), मानसिंगराव फत्तेसिंगराव नाईक (चिखली), विश्वास बळवंत कदम (शिराळा), राजाराम शामराव पाटील (वाकुर्डे खुर्द), यशवंत पांडुरंग निकम (शिराळा), संभाजी बाळू पाटील (काळुंद्रे), शिवाजीराव वसंत पाटील (पणुंब्रे तर्फ वारुण), विष्णू महादेव पाटील (बिळाशी), बाबासाहेब यशवंतराव पाटील (सरूड, ता. शाहुवाडी), अजितकुमार सदाशिव पाटील (चरण), हंबीरराव केशवराव पाटील (भेडसगाव, ता. शाहुवाडी), यशवंत दादू दळवी (मालेवाडी, ता. शाहुवाडी), तुकाराम पांडुरंग पाटील (पुसाले, ता. शाहुवाडी). संस्था गट : बाळासो ज्ञानू पाटील (पाडळेवाडी). अनुसूचित जाती किंवा जमाती : संदीप दिनकर तडाखे (मांगले). : महिला गट : कोमल विश्वास पाटील (बांबवडे) व अनिता कोंडीबा चौगुले (आरळा). इतर मागासवर्गीय : सुहास शिवाजीराव पाटील (कोकरूड). भटक्या जाती व विमुक्त जमाती विशेष मागास प्रवर्ग : बिरू सावळा आंबरे (पुनवत).

याबाबत सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष आमदार मानसिंगराव नाईक म्हणाले, सभासदांनी विश्वास दाखवला, तसेच माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक, मध्यवर्ती बँकेचे संचालक सत्यजित देशमुख यांनी ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी सहकार्य केले. ज्यांनी अर्ज भरले व निवडणूक बिनविरोध होण्यासाठी उमेदवारी अर्ज माघार घेतली त्यांचे आभार व धन्यवाद.

Back to top button