पिस्तूल रोखल्याप्रकरणी 9 जणांना केले गजाआड

3 पिस्तूल, 5 राऊंड, 4 कोयते, 2 दुचाकींसह 2 लाख 25 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त
Sangli Crime Branch New
कुपवाड : शहरातील सागर माने याच्यावर पिस्तूल रोखण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी अटक केलेले 9 संशयित.Pudhari Photo

कुपवाड : पुढारी वृत्तसेवा

शहरातील दत्ता पाटोळे याच्या खून प्रकरणात त्याची पत्नी वनीता यांना न्यायालयीन कामात मदत केल्याचा राग मनात धरून सागर राजाराम माने (वय 35, रा. राजारामबापू हौसिंग सोसायटी, वाघमोडे मळा, कुपवाड) याच्यावर पिस्तूल रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. तसेच चाकूचा धाक दाखवून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी कुपवाड पोलिसांनी आतापर्यंत 9 संशयितांना गजाआड केले. गुन्ह्यात वापरलेली 3 देशी बनावटीची पिस्तूल, 5 राऊंड, 4 कोयते, दोन दुचाकी असा एकूण 2 लाख 25 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक प्रणिल गिल्डा यांनी दिली.

Sangli Crime Branch New
मिरजेत तरुणाकडून पिस्तूल, काडतुसे जप्त

संशयित संदेश घागरे व त्याच्या साथीदारांनी सागर माने याच्यावर पिस्तूल रोखून खटका दाबला होता. परंतु पिस्तुलातून गोळी न उडाल्याने सागर माने वाचला होता. घटनेनंतर सर्व संशयित फरार झाले होते. कुपवाड पोलिस, सायबर शाखा सांगली, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग, मिरज शहर व मिरज ग्रामीण पोलिस यांची पथके हल्लेखोरांच्या शोधासाठी रवाना झाली होती. शुक्रवार दि. 12 रोजी आष्टा येथील बसस्थानक परिसरात पथकांनी संशयित संदेश रामचंद्र घागरे (वय 21), किरण दादासाहेब कोंडिग्रे (वय 20), अनिकेत दत्ता कदम (वय 20, तिघेही रा. वाघमोडेनगर, कुपवाड) व प्रतीक शिवाजी कोळेकर (वय 19, रा. शरदनगर, कुपवाड) यांना अटक करून एका अल्पवयीनाला ताब्यात घेतले होते.

Sangli Crime Branch New
धक्कादायक : पोलिसाच्या मुलाने पिस्तूल तोंडासमोर धरली आणि ट्रिगर दाबला…

कुपवाड पोलिसांनी यापूर्वी संशयित किरण शंकर लोखंडे (वय 23, रा. वाघमोडेनगर, कुपवाड) व सोन्याबापू हरी एडके (वय 28, रा. बामणोली ता. मिरज) या दोघांना अटक केली होती. या प्रकरणात आणखी तिघांचा समावेश असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने पोलिसांनी गुरुवारी मध्यरात्री मलिक सलीम शेख (वय 27), दादासाहेब मारुती शेजुळ (वय 26, दोघेही रा. दत्तनगर, बामणोली ता. मिरज), सौरभ शहाजी मासाळ (वय 24, रा. वाघमोडेनगर, कुपवाड) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. आजअखेर अटक केलेल्या संशयितांची संख्या नऊ झाली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news