मिरजेत तरुणाकडून पिस्तूल, काडतुसे जप्त

एलसीबीची कारवाई; विक्रीसाठी आला असताना अटक
Police seized pistol, cartridges from Mirjet youth from the accused
पोलिसांनी आरोपीकडून मिरजेत तरुणाकडून पिस्तूल, काडतुसे जप्तPudhari File Photo

सांगली, पुढारी वृत्तसेवा : विनापरवाना देशी बनावटीचे पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे बाळगल्याप्रकरणी मिरजेतील तरुणाला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने अटक केली. जावेद जाकीर शेख (वय 30, रा. ईदगाहनगर, उस्मानी मोहल्ला, मिरज) असे संशयिताचे नाव आहे. त्याच्याकडून 50 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला.

पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी अवैध शस्त्रे बाळगणार्‍यांवर कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला दिले होते. पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांनी सहायक निरीक्षक पंकज पवार यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक नियुक्त केले होते. या पथकातील अभिजित ठाणेकर, रोहन घस्ते यांना सोमवारी (दि.1) दुपारी 1 ते 1.30 च्या सुमारास मिरजेतील जनावर बाजार परिसरात एकजण पिस्तुल विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार एलसीबीच्या पथकाने सापळा लावला. जावेद शेख हा बाजार परिसरातील प्रवेशव्दारापाशी येवून थांबला होता. त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

Police seized pistol, cartridges from Mirjet youth from the accused
Jalgaon Crime|AK-47 ची काडतुसे जवळ बाळगणाऱ्या उपअभियंत्याला पकडलं

शेख याची झडती घेतली असता कमरेस अडकवलेले 50 हजार रुपये किंमतीचे देशी बनावटीचे पिस्तुल (मॅग्झीनसह) आणि 800 रुपयांची 2 जिवंत काडतुसे आढळून आली. विनापरवाना पिस्तुल बाळगण्याप्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली. या कारवाईत पोलिस कर्मचारी अमोल ऐदाळे, सचिन धोत्रे, कुबेर खोत, अरुण पाटील, सुनील जाधव, संकेत मगदूम, रोहन घस्ते, अजय पाटील यांनी भाग घेतला. शेख याच्यावर भारतीय शस्त्र अधिनियमाप्रमाणे महात्मा गांधी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news