Miraj Dog Paralysis : मिरजेच्या ‘या’ गावातील ९ कुत्र्यांना ‘लकवा’ | पुढारी

Miraj Dog Paralysis : मिरजेच्या ‘या’ गावातील ९ कुत्र्यांना ‘लकवा’

मिरज : पुढारी वृत्तसेवा

मिरज तालुक्यातील करोली (एम) येथे सरपंच वस्ती, हणमंत वस्ती या ठिकाणी अनेक भटक्या कुत्र्यांना विषबाधा झाल्याचे आढळून आले आहे. त्यापैकी नऊ कुत्र्यांना लकवा (Miraj Dog Paralysis) मारला असून त्यांच्यावर मिरज पशुवैद्यकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले.

मिरजेच्या ‘या’ गावातील ९ कुत्र्यांना ‘लकवा’
मिरजेच्या ‘या’ गावातील ९ कुत्र्यांना ‘लकवा’

करोली (एम) येथे भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट झाला आहे. ग्रामस्थांकडून कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची वारंवार मागणी होत होती. गुरुवारी अनेक कुत्री सरपंच वस्ती आणि हणमंत वस्ती या ठिकाणी रस्त्याकडेला तसेच शेतामध्ये ठिकठिकाणी पडल्याचे दिसून आले.
काही ग्रामस्थ आणि प्राणीमित्रांनी त्यांची पाहणी केली. त्यावेळी त्यांना विषबाधा झाल्याचे निदर्शनास आले. नऊ कुत्र्यांच्या पायाला लकवा मारला असल्याचे आढळून आले. त्यामुळे त्यांना तत्काळ पशुवैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

भटक्या कुत्र्यांमुळे ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. त्यामुळे बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत होती. त्या पार्श्वभूमीवर अचानक मोठ्या प्रमाणात कुत्र्यांना विषबाधा झाली असल्याचे आढळून आले आहे. नेमकी त्यांना कोणत्या अन्नातून विषबाधा झाली याबाबत गावात उलटसुलट चर्चा सुरू होती.

Back to top button