mla gopichand padalkar : आ. पडळकरांची जीभ घसरली | पुढारी

mla gopichand padalkar : आ. पडळकरांची जीभ घसरली

सांगली; पुढारी वृत्तसेवा : भाजपचे आमदार गोपिचंद पडळकर ( mla gopichand padalkar ) यांची जीभ पुन्हा एकदा घसरली. पालकमंत्री तथा राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन पडळकरांनी टीका केली. मंत्री पाटील हा बिनडोक माणूस आहे, असे वक्तव्य त्यांनी बुधवारी केले.

पडळकर ( mla gopichand padalkar ) म्हणाले, जलसंपदा मंत्री आपल्या जिल्ह्यातील आहेत. ते डोके तिसरेकडे लावतात. त्यांचे जे खाते आहे, त्यात त्यांचे डोके लागत नाही. आपल्याला वाटते तो माणूस फार हुशार आहे. मात्र, तो एक नबंरचा बिनडोक माणूस आहे. कवठेमहाकाळ येथील नगरपंचायत निवडणूक प्रचारादरम्यान बोलत होते.

Back to top button