Nagar Panchayat Election : सांगली जिल्ह्यातील ३ नगरपंचायतीच्या प्रत्येकी ४ जागांची निवडणूक स्थगित | पुढारी

Nagar Panchayat Election : सांगली जिल्ह्यातील ३ नगरपंचायतीच्या प्रत्येकी ४ जागांची निवडणूक स्थगित

विटा : पुढारी वृत्तसेवा – सांगली जिल्ह्यातील २१ डिसेंबर रोजी होणाऱ्या खानापूर आणि कडेगाव कवठेमहांकाळ या तिन्ही नगरपंचायतीमधील प्रत्येकी दोन, पुरुष आणि महिला अशा ४ ओबीसी राखीव जागांच्या निवडणूका रद्द झाल्या आहेत. (Nagar Panchayat Election)

सुप्रीम कोर्टाने ओबीसी आरक्षण रद्द केल्यानंतर गेल्या दोन महिन्यापूर्वी राज्य सरकारने स्वतः च्या अखत्यारीत ओबीसींना २७ टक्के राजकीय आणि शैक्षणिक आरक्षण देण्याचा आदेश जारी केला. मात्र या आदेशाला आता आज सुप्रीम कोर्टाने स्थगित केले आहे.

सुप्रीम कोर्टाने हा स्थगिती आदेश दिल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने ही तात्काळ सध्या निवडणूक प्रक्रिया सुरू असणाऱ्या आगामी महानगरपालिकेच्या सह सर्व स्थानिक निवडणुकां मध्ये ओबीसी आरक्षण रद्द केले आहे.

दरम्यान, काल निर्णय घेतल्यानंतर आज दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास राज्यातील १०५ नगरपंचायतीमध्ये आज मंगळवारी अर्ज दाखल करण्याला केवळ दोन तास उरलेले असताना राज्य निवडणूक आयोगाने एक परिपत्रक कुठे काढून ओबीसी राखीव असलेल्या जागांची निवडणूक स्थगित केली. (Nagar Panchayat Election)

परिणामी दुपारी अडीच-पावणे तीन नंतर संबंधित ओबीसी जागांच्यासाठी लढणाऱ्या उमेदवारांचे उमेदवारी अर्ज स्वीकारले गेले नाहीत.
राज्यातील १०५ नगरपंचायतीमध्ये ७ डिसेंबर रोजी अर्ज दाखल करण्याची शेवट ची मुदत होती. सांगली जिल्ह्यातील खानापूर, कडेगाव आणि कवठेमहांकाळ या तीन नगर पंचायतींचा समावेश आहे.

राज्य निवडणूक आयोगाच्या जाहीर निवडणूक कार्यक्रमानुसार १ ते ७ डिसेंबर अर्ज दाखल होतील. ८ डिसेंबर ला दाखल अर्जांची छाननी. तर २१ डिसेंबर रोजी प्रत्यक्ष मतदान होणार आहे. तर दुसऱ्याच दिवशी २२ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

मात्र आता निवडणूक प्रक्रिया मध्ये आली असताना सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार राज्य निवडणूक आयोगाने तात्काळ ओबीसी आरक्षण रद्द केल्याचे जाहीर केले आहे त्यामुळे सांगली जिल्ह्यातील , खानापूर आणि कडेगाव कवठेमहांकाळ या तिन्ही नगरपंचायतीमधील प्रत्येकी दोन पुरुष आणि दोन महिला ओबीसी राखीव जागांची निवडणूक स्थगित केली आहे.

याचा थेट फटका सर्वच राजकीय पक्षांना आणि गटांना बसला आहे. या तिन्ही नगर पंचायतींमध्ये मध्ये सध्या एकूण १७ जागांसाठी निवडणूक होणार होती. मात्र आता ४ जागांची निवडणूक स्थगित केल्यामुळे केवळ १३ जागांच्यासाठीच निवडणूक होणार आहे.

हेही वाचा

Back to top button