Sangli Lok Sabha Election : विशाल पाटील समर्थकांची गुलालाची उधळण; फटाक्‍यांची आतषबाजी | पुढारी

Sangli Lok Sabha Election : विशाल पाटील समर्थकांची गुलालाची उधळण; फटाक्‍यांची आतषबाजी

सांगली ; पुढारी वृत्‍तसेवा  बहुचर्चित सांगली लोकसभेच्या मतमोजणीकडे संपूर्ण राज्‍याचे लक्ष लागून राहिले आहे. अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांना आघाडी मिळाल्यानंतर काँग्रेस कमिटी जवळ विशाल पाटील समर्थकांनी गुलालाची उधळण करत जल्लोष करण्यास सुरुवात केली आहे. विशाल पाटील यांच्या कार्यालयाबाहेर फटाक्यांची आतषबाजी करण्यात येत आहे. सहाव्या फेरी अखेर अपक्ष उमेदवार विशाल पाटील हे 30 हजार 696 मतांनी पुढे आहेत.

प्रत्येक फेरीनिहाय विशाल पाटील हे आघाडीवर असल्याने त्यांच्या कार्यालयाबाहेर आता जल्लोष सुरू झाला आहे. फटाक्यांची आतषबाजी करत कार्यकर्त्यांकडून जल्लोष करण्यात येत आहे.

जागावाटपापासून ते उमेदवारी मिळण्यापर्यंत राज्यात बहुचर्चित आणि सतत वादग्रस्त ठरलेल्या सांगलीचा खासदार आज ठरेल. महायुतीचे उमेदवार, भाजपचे विद्यमान खासदार संजय पाटील की, काँग्रेसचे राज्य उपाध्यक्ष असलेले; पण अपक्ष म्हणून निवडणूक लढविलेले उमेदवार विशाल पाटील यांच्यापैकी मतदार कोणाला विजयाची माळ घालणार, याचा फैसला आज होणार आहे.

संबंधित बातम्या

हेही वाचा : 

Back to top button