Nagpur Lok Sabha Election Result : गडकरी, ठाकरे, पारवे, बर्वे कुणाला धक्का; कुणाची धाकधूक

Nagpur Lok Sabha Election Result : गडकरी, ठाकरे, पारवे, बर्वे कुणाला धक्का; कुणाची धाकधूक
Published on
Updated on

नागपूर : राजेंद्र उट्टलवार नागपूर लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे, रामटेक लोकसभा मतदारसंघ शिवसेना उमेदवार राजू पारवे व काँग्रेस उमेदवार श्यामकुमार बर्वे, वंचितचे किशोर गजभिये यांच्या भाग्याचा फैसला आज होत आहे. यानिमित्ताने कुणाला धक्का मिळणार तर कुणाचे नशीब फळफळणार हे स्पष्ट होणार आहे.

आजवर ज्या ईव्हीएम तिहेरी कडक बंदोबस्तात बंद होत्या त्या आज मंगळवारी बाहेर आल्या. सकाळी ५.३० वाजता स्ट्रॉंगरूम उघडले. एक सुरक्षित कॉरिडॉर तयार करण्यात आला असून यातूनच ईव्हीएम मतमोजणीस्थळी राजकीय प्रतिनिधींच्या देखरेखीत आणल्या गेल्या. सकाळी 8 वाजता प्रत्यक्ष पोस्टल मतांच्या मतमोजणीला सुरुवात झाली.

कळमना मार्केट यार्ड येथे सर्वप्रथम पोस्टल बॅलेटची मोजणी होणार असून, त्यानंतर ईव्हीएमच्या मतमोजणीला सुरूवात होणार आहे. जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांचे मार्गदर्शनात कळमना मार्केट यार्ड परिसरामध्ये सीआरपीएफ, एसआरपीएफ आणि सुमारे दीड हजारांवर पोलिस तैनात आहेत. सुमारे दीडशे सीसीटीव्ही कॅमेरे स्ट्रॉंग रूम आणि मतमोजणी परिसरात लावण्यात आले आहेत.

राजकीय पक्षांचे पोलिंग ऐजंटला मतमोजणी प्रक्रियेवर काही शंका उपस्थित झाल्यास ते लेखी आक्षेप नोंदवू शकतात. मात्र आक्षेप हा खरंच योग्य आहे का? याची पडताळणी करून आरओ त्यांच्या आक्षेपाचे समाधान करणार असल्याचे डॉ. इटनकर यांनी स्पष्ट केले. उमेदवारांचे मतमोजणी प्रतिनिधी, मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी, कर्मचारी यांना मतमोजणी केंद्रामध्ये मोबाईल व इतर कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू घेऊन जाण्यास मनाई करण्यात आली आहे. प्रवेशद्वारावर याबाबतची तपासणी करूनच मतमोजणी केंद्रामध्ये प्रवेश देण्यात येणार आहे.

अशी आहे संपूर्ण प्रक्रिया

– पहाटे ५.३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील पोस्टल-बँलेट असलेली स्ट्राँग रुम उघडणार
-६ वाजता ईव्हीएम ठेवलेली कॉटन मार्केटमधील स्ट्राँग रूम उघडली जाणार
-एक तास ईव्हीएमची स्ट्राँग रुम सुरक्षेत उघडी ठेवली जाईल
-२ स्वतंत्र गाड्यांतुन प्रत्येक फेरीपूर्वी ईव्हीएम मतमोजणी केंद्रापर्यंत आणले जाईल
-अर्ध्या तासात प्रत्येक फेरी आटोपण्याचा प्रयत्न
-दुपारी ४ पर्यंत संपूर्ण निकालाचा प्रयत्न

नागपूरचे विधानसभानिहाय मतदार, मतदान व टक्केवारी

विधानसभा एकूण मतदार एकूण मतदान टक्केवारी
नागपूर दक्षिण-पश्चिम ३,७६,४०८ १,९९,२५८ ५२.९४
नागपूर दक्षिण ३,७२,४९५ २,००,९९८ ५३.९६
नागपूर पूर्व ३,८७,७६२ २,१६,२७४ ५५.७८
नागपूर मध्य ३,१५,८४९ १,७१,४४१ ५४.२८
नागपूर पश्चिम ३,६५,३४३ १,९६,२८७ ५३.७३
नागपूर उत्तर ४,०५,४२४ २,२३,४८० ५५.१२
एकूण २२,२३,२८१ १२,०७,७३८ ५४.३२

रामटेकचे विधानसभानिहाय मतदार, मतदान टक्केवारी

विधानसभा एकूण मतदार एकूण मतदान टक्केवारी
काटोल २,७३,८१४ १,७२,३९० ६२.९६
सावनेर ३,१४,६०५ १,९३,२६९ ६१.४३
हिंगणा ४,२४,१५८ २,२९,७३३ ५४.१६
उमरेड २,९३,८२९ १,९७,३४१ ६७.१६
कामठी ४,६६,२३१ २,७३,६४१ ५८.६९
रामटेक २,७६,४४८ १,८३,८१६ ६६.४९
एकूण २०,४९,०८५ १२,५०,१९० ६१.०१

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news