अज्ञात मोटारसायकलच्या धडकेत ८० वर्षीय वृद्धा ठार

बिऊर येथील मोरणा पुलाजवळील घटना; चालक अपघातानंतर पसार
sangali accident news
अज्ञात मोटारसायकलच्या धडकेत ८० वर्षीय वृद्धा ठारfile photo
Published on
Updated on

80-year-old woman killed in hit-and-run by unknown motorcycle

शिराळा : पुढारी वृत्तसेवा

शिराळा-कोकरूड रस्त्यावर बिऊर गावच्या मोरणा नदीच्या पुलाजवळ अज्ञात मोटारसायकलच्या धडकेत ८० वर्षीय वृद्धेचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (दि. १३ एप्रिल) सायंकाळी घडली. किसाबाई बाळकू पाटील (वय ८०, रा. बिऊर) असे मृत वृद्धेचे नाव असून, अपघातानंतर चालक मोटारसायकलसह घटनास्थळावरून पसार झाला आहे. या प्रकरणी शिराळा पोलीस ठाण्यात अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

sangali accident news
Kolhapur Crime |नागाव येथे जमिनीच्या वादातून धारदार शस्त्रांनी प्राणघातक हल्ला, आठ जखमी, तीन गंभीर : बत्तीस जणांवर गुन्हा दाखल!

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सायंकाळी सुमारे ७:३० वाजण्याच्या सुमारास किसाबाई पाटील या मोरणा नदीचा पूल ओलांडून कोकरूडकडे जाणाऱ्या रस्त्याच्या उजव्या बाजूने पायी चालत होत्या. यावेळी समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात मोटारसायकलने त्यांना जोरदार धडक दिली.

या भीषण अपघातात त्यांच्या डोक्याला, हाताला आणि पायाला गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर जखमींना मदत करण्याऐवजी संबंधित चालकाने कोणतीही माहिती न देता मोटारसायकलसह घटनास्थळावरून पलायन केले. गंभीर जखमी झालेल्या किसाबाई पाटील यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

sangali accident news
समृद्धी महामार्गावर अमोनिया नायट्रेटची गळती; टँकर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

या प्रकरणी मयताचे नातू राजेंद्र विष्णू पाटील (वय ३५, रा. नाथ फाटा, शिराळा) यांनी शिराळा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शशिकांत पाटील करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news