

नागाव : नागाव ता. हातकणंगले येथे जमिनीच्या वादातून प्राणघातक हल्ला झाल्याची घटना घडली. यामध्ये सुधाकर आनंदराव ऐतवडे, हर्ष प्रभाकर ऐतवडे, अभिजित महेश सुर्यवंशी व पार्थ जाधव अशी जखमींची नावे आहेत. त्यांच्यावर कोल्हापूर येथे खाजगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत. ही घटना वड्याचा मळा नागाव येथे दुपारी तीनच्या सुमारास घडली.
याबाबत घटनास्थळावरून व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, प्रभाकर ऐतवडे व राजेंद्र चौगुले व महादेव चौगुले यांचा शेतजमिनीतील वहिवाटीच्या रस्त्यावरून बरीच वर्षे वाद सुरू आहे. महसूल विभागाच्या कागदोपत्रवरुन हा रस्ता प्रभाकर व सुधाकर ऐतवडे यांच्या मालकीचा असून तशी सातबारा पत्रकी नोंद आहे. हा रस्ता बंद करण्यासाठी ऐतवडे यांनी रीतसर महसूल विभागाची सर्व कागदपत्रे शिरोली एमआयडीसी पोलिसांकडे दाखल केली होती. याबाबत सहायक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांनी दोन्ही बाजूकडील लोकांशी चर्चा करून कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी ऐतवडे त्यांच्या कामात विरोध न करण्याची चौगुले यांना नोटीस लागू करण्यात आली होती. तसेच तुम्हाला याबाबत काही तक्रार असल्यास दिवाणी न्यायालयात जावू शकता असे पोलिसांनी सांगितले होते.
त्यानंतर गुरुवारी दुपारी प्रभाकर ऐतवडे हे आपल्या हद्दीनुसार कंपाउंड घालत असताना चौगुले यांनी कसबा सांगाव गोकुळ शिरगाव व अन्य गावातील आपले नातेवाईक बोलावून घेतले. या ठिकाणी ३० ते ३५ नातेवाईक घटनास्थळी चार ते पाच कारमधून आले होते. यावेळी जोरदार वादावादी होऊन चौगुले व त्यांच्या बाहेरुन आलेल्या तरुणांनी तलवारी, जंबिया, कोयते,फायटर , हॉकी स्टिक, काठ्या अशा प्राणघातक हत्यारांनी प्रभाकर ऐतवडे व त्यांच्या घरच्या मंडळीवर प्राण घातक हल्ला केला.
या हल्ल्यामध्ये १] प्रभाकर ऐतवडे २] सुधाकर आनंदराव ऐतवडे, ३] हर्ष प्रभाकर ऐतवडे, ४] अभिषेक महेश सुर्यवंशी, [५] अंकुश दत्तु गुडाळे, ६] हर्षचा मित्र पार्थ, ७] सिंधुताई आनंदराव ऐतवडे, ८] साधना प्रभाकर ऐतवडे, ९] सुनिल यशवंत ऐतवडे सर्व रा. नागांव यामध्ये सुधाकर आनंदराव ऐतवडे यांचे दोन ते तीन नातेवाईक गंभीर जखमी झाले असून पाच जण किरकोळ जखमी झाले आहेत. सदरची घटना समजताच शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक कर्मचाऱ्यांसह फाट्यासह तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलीस आल्याचे पाहताच हल्लेखोरांनी उसाच्या शेतातून रत्नागिरी नागपूर दिशेने पळ काढला. घटनास्थळी हत्यारांचा खच पडला होता. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. जखमी वर कोल्हापूर येथील सिपीआर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. काही जणांना पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे..
पोलीसांनी पुढील आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. १] महादेव बाबुराव चौगुले व.व.४१, २] राजेंद्र बाबुराव चौगुले व. व. ५५, ३] सुधिर धोंडीराम चौगुले व. व. ४१, ४] सुभाष बापु चौगुले व व. ६०, ५] संजय ज्ञानु चौगुले व. व. ५७, ६] सुकुमार धोंडीराम चौगुले व. व. ४७ सर्व रा. नागांव ता. हातकणंगले ७] गणेश सागर माळी व. व. २१ रा. कसबा सांगाव ता.कागल, ८] योगेश संजय माळी व. व. २६ रा. गोकुळ शिरगांव ता. करवीर ९] दर्शन चौगुले, [१०] शुभम चौगुले, ११] प्रसन्न चौगुले,१२] सरिता राजेंद्र चौगुले, [१३] राणी महादेव चौगुले, १४] सुनिता संजय चौगुले, १५] आशा सुभाष चौगुले, १६] रुपाली सुकुमार चौगुले, १७] समृध्दी सुधीर चौगुले, इतर आरोपीचे पाहुणे व मित्र पुरुष अंदाजे २० ते २५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी सतरा जणांना ताब्यात घेतले असून अन्य फरार आरोपींना शोधण्याचे काम सुरू आहे.
सपोनी गायकवाड यांनी पाठलाग करुन एका आरोपीला पकडले
याप्रकरणी शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड व पोलीस करीत आहेत. प्राणघातक हत्यारासह हल्ला सुरू असलेला फोन सपोनि सुनील गायकवाड यांना येताच त्यांनी तात्काळ पोलीस ठाण्यातील सहकारी घेऊन घटनास्थळी धाव घेतली पोलीस आल्याचे पाहताच हल्लेखोर पळून जात होते पैकी एका आरोपीला स्वतः गायकवाड यांनी पाठलाग करून पकडले.. पोलीस घटनास्थळी वेळीच दाखल झाले नसते तर मोठा अनर्थ घडला असता..