विटा : पुढारी वृत्तसेवा : भाजपमध्ये आजपर्यंत पक्षवाढीसाठी काम केले. परंतु, पक्षाने त्याची दखल न घेता अलीकडे माझ्याविरोधात गट बांधण्याचे व माझे अवमूल्यन करण्याचे काम वरिष्ठ पातळीवरुन सुरू करण्यात आले. ते मला सहन करणे शक्य नाही. त्यामुळे मला स्वतंत्रपणे विचार करण्यासाठी मी पक्षाच्या जबाबदारीतून मुक्त होत आहे. मी भाजप पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे, अशा शब्दांत जतचे माजी आमदार आणि भाजप नेते विलासराव जगताप यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. Vilasrao Jagtap resigns
सांगलीची लोकसभा निवडणूक सध्या राज्यभर गाजत आहे. एकीकडे भाजप महायुतीने विद्यमान खासदार संजय पाटील यांनाच उमेदवारी पुन्हा दिल्याने जिल्ह्यातील भाजप अंतर्गत नाराज गटाचा सूर मोठा होत असताना दिसत आहे. त्यातच सांगली हा काँग्रेसचा बालेकिल्ला असतानाही महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या शिवसेना ठाकरे गटाने डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे काँग्रेसचे विशाल पाटील बंडखोरीच्या तयारीत आहेत. ते मंगळवारी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. Vilasrao Jagtap resigns
महाविकास आघाडीमध्येही असंतोष वाढत चाललेला असताना आता खुद्द भाजपमध्येही असंतोषाचे स्फोट होत आहेत. जतचे भाजपचे माजी आमदार विलासराव जगताप यांनी भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत म्हाविकास आघाडीचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांना पाठिंबा जाहीर केला आहे. याबाबत आज सोमवारी जतचे माजी आमदार विलासराव जगताप यांनी आपली भूमिका जाहीर करण्यासाठी मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात त्यांनी आपण विशाल पाटील यांच्या मागे ठाम राहणार आहोत, अशी घोषणा करत भाजपच्या पक्ष सदस्यत्वाचाही राजीनामा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांना पाठवलेला आहे.
हेही वाचा