Sangli Lok Sabha : आमचं काय चुकलं ?: सांगलीची जागा ठाकरे गटाकडे गेल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांचे स्टेट्स

सांगली काँग्रेस कमिटी
सांगली काँग्रेस कमिटी

पुढारी ऑनलाईन डेस्क : लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला मंगळवारी (दि.९) जाहीर करण्यात आला. सांगली लोकसभा मतदारसंघातून ठाकरे गटाने डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे सांगलीतील काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले असून आमचं काय चुकलं ? अशा आशयाचे स्टेट्स सर्वत्र झळकू लागले आहेत. तर माजी मंत्री विश्वजीत कदम, विशाल पाटील नॉट रिचेबल झाले आहेत. आता ते कोणती भूमिका घेतात, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. Sangli Lok Sabha

सांगलीची जागा ठाकरे गटाकडे गेल्याने काँग्रेस कार्यकर्ते नाराज झाले आहेत. तर काँग्रेसकडून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेले विशाल पाटील संपर्क क्षेत्राबाहेर गेले आहेत. तर माजी मंत्री विश्वजीत कदमही नॉट रिचेबल झाले आहेत. सांगलीतील काँग्रेस कमिटीत सन्नाटा पसरला आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांनी आमचं काय चुकलं, अशा आशयाचे स्टेट्स ठेवून आपल्या नाराजीला वाट मोकळी करून दिली आहे. आता विशाल पाटील अपक्ष लढणार का ? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. Sangli Lok Sabha

Sangli Lok Sabha : विशाल पाटील अपक्ष निवडणूक लढवणार ?

सांगली लोकसभेच्या जागेवरून शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यातला वाद टोकाला गेला होता. दरम्यान, सांगली लोकसभा मतदारसंघ ठाकरेंच्या शिवसेनेकडेच राहणार असल्याचे आज महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आले. शिवसेनेने हा मतदारसंघ काँग्रेसला सोडलेला नाही. यामुळे विशाल पाटील अपक्ष निवडणूक लढतील, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रहार पाटील यांची सांगलीतील उमेदवारी मागे घ्या, असा आग्रह काँग्रेसकडून धरण्यात आला. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांचे उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणे झाले. पण ठाकरे सांगलीच्या जागेवर ठाम राहिले. यामुळे काँग्रेसला ही जागा सोडावी लागली.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news