पुढारी अ‍ॅग्रीपंढरी प्रदर्शनाची जोरदार तयारी; सांगलीत आयोजन | पुढारी

पुढारी अ‍ॅग्रीपंढरी प्रदर्शनाची जोरदार तयारी; सांगलीत आयोजन

सांगली; पुढारी वृत्तसेवा : पुढारी माध्यम समूह व महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी सांगलीत होणार्‍या प्रात्यक्षिकयुक्त कृषी प्रदर्शनाची जोरदार तयारी सुरू आहे. दि. 16 ते 19 फेब्रुवारीदरम्यान हे प्रदर्शन होणार आहे. यंदाचे चौथे वर्ष आहे. शेतकर्‍यांना 50 हून अधिक पिके व प्रात्यक्षिके पाहण्याची संधी यानिमित्ताने मिळणार आहे. दोनशेहून अधिक कंपन्यांचा सहभाग आहे.

ऑर्बिट क्रॉप न्युट्रिएंट हे टायटल प्रायोजक, तर रॉनिक होम अ‍ॅप्लायसेन्स हे सहप्रायोजक आहेत. शेती क्षेत्रामध्ये होणारे बदल व त्यावरील उपाय शेतकर्‍यांपर्यंत पोहोचण्यासाठी दैनिक पुढारीतर्फे प्रात्यक्षिक प्रदर्शन आयोजित केले जाते. नवनवीन होणारे शोध प्रदर्शनाच्या ठिकाणी पाहावयास मिळणार आहेत. येथील न्यायालयाच्या पाठीमागे कृषी विभागाच्या जागेत 50 हून अधिक पिकांचे प्रात्यक्षिक प्लॉट तयार होत आहेत. त्याशिवाय प्रदर्शनात ठिबक सिंचन, अत्याधुनिक रोपण, निरनिराळे बी-बियाणे, खते, कीटकनाशके, बुरशीनाशके, रोपण पद्धती, सोलर पंप, तुषार सिंचन, शेततळे कागद, शेडनेट, शेती अवजारे, ट्रॅक्टर, मालवाहू वाहने, फवारणी यंत्रे, तयार नर्सरी व पशुपालन व्यवसायातील विविध अवजारे, पशुखाद्य, मस्त्यपालनासाठी शेततळे, कुक्कुटपालनमधील खाद्यसामग्री, शासनाच्या विविध योजना, विविध पिके व फळझाडांची नर्सरी अशा विविध घटकांची माहिती एकाच ठिकाणी मिळणार आहे .
सहभागी होण्यासाठी बाळासाहेब 9850556009, राहुल 9850844271 यांच्याशी संपर्क करावा.

Back to top button