देशात प्रत्येक तासाला ३ , दिवसाला ७८ हत्या! ‘एनसीआरबी’चा अहवाल | पुढारी

देशात प्रत्येक तासाला ३ , दिवसाला ७८ हत्या! ‘एनसीआरबी’चा अहवाल

विवेक दाभोळे

सांगली :  देशात प्रत्येक तासाला तीन, दिवसाला 78 हत्या होतात. 2021 पेक्षा 2022 मध्ये हे प्रमाण कमी झाले, हा थोडासा दिलासा. नॅशनल क्राईम रेकॉर्डस् ब्यूरोकडून (एनसीबीआर) जाहीर झालेल्या अहवालातील ही धक्कादायक माहिती आहे…

हत्या अन् कारणे…

9,962
किरकोळ वादातून
3,761
वैयक्तिक शत्रुत्व, सूडभावनेतून
1, 884
आर्थिक लालसेतून

केंद्रशासित प्रदेशात हत्या कमी

2022 या वर्षात सिक्कीममध्ये 9, नागालँडमध्ये 21, मिझोराममध्ये 47 हत्यांच्या घटनांची नोंद झाली. दिल्लीमध्ये खुनाच्या 509 घटनांची नोंद झाली होती. जम्मू-काश्मीरमध्ये 99, पाँडेचरीत 300, चंदीगडमध्ये 18, दादरा आणि नगर हवेलीत 16, अंदमान आणि निकोबारमध्ये 7, लडाखमध्ये 5 आणि लक्षद्वीपमध्ये शून्य अशी खुनाच्या घटनांची नोंद झाली.

महाराष्ट्रात वाढले सायबर गुन्हे…

महाराष्ट्रात सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत आहे. मुंबईत दर नवव्या-दहाव्या मिनिटाला नवा गुन्हा नोंद होतो. शेतकरी आणि विद्यार्थी यांच्या आत्महत्यांचे प्रमाण चिंताजनक आहे. मुंबईत दिल्लीखालोखाल चोर्‍या होतात. जवळपास 18 हजार चोर्‍यांचा आकडा पोलिसांकडील नोंदीनुसार आहे. मुंबई आणि राज्यातील सायबर गुन्हे एकाच वर्षात तब्बल 64 टक्क्यांनी वाढलेे आहेत.

 

 

 

 

 

Back to top button