सांगली : म्हैसाळचे पाणी बंद करण्यास विरोध केल्याने तीन शेतकऱ्यांवर गुन्हा | पुढारी

सांगली : म्हैसाळचे पाणी बंद करण्यास विरोध केल्याने तीन शेतकऱ्यांवर गुन्हा

जत : पुढारी वृत्तसेवा : बिळूर (ता.जत) येथे म्हैसाळचे पाणी बंद करण्यास विरोध केल्याने तीन शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शुक्रवारी रात्री उशिरा घडली. याबाबतची फिर्याद पाटबंधारे विभागाचे विजय शिवाप्पा कांबळे यांनी जत पोलीस ठाण्यात दिली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, संशयित तिघे आरोपी विठ्ठल बाळाप्पा दोडमनी, गुरबसू मासाळ व शिवानंद मंगसुळी यांनी पाण्याचा प्रवाह आऊटलेट परस्पर ओपन करुन पाणी चालू केल्याची माहिती साई कन्स्ट्रक्शन कंपनीचे इंजिनियर देशमुख यांच्याकडून मिळाली. त्यानंतर त्यांनी कर्मचा-यास सदरचे आऊटलेट बंद करण्याच्या सुचना दिल्या. परंतु, त्या भागातील शेतक-यांनी ते बंद करण्यास विरोध केला. त्यानंतर फिर्यादीने स्वत: रात्री ८.३० च्या सुमारास जाऊन आऊटलेट बंद करण्याची विनंती शेतक-यांना केली.

परंतु, त्यांनी पाटबंधारे विभागाचे अधिकारी यांचे न ऐकता आऊटलेट बंदला विरोध केला. त्यामुळे सिंचनाचा विस्कळीतपणा निर्माण झाला. म्हणून शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी व पाटबंधारे अधिनियम 1976 चे कलम 93 एक व 93 ड याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा 

Back to top button