मुंबई-कोल्हापूर वंदे भारत एक्स्प्रेस लवकरच धावणार | पुढारी

मुंबई-कोल्हापूर वंदे भारत एक्स्प्रेस लवकरच धावणार

मिरज; पुढारी वृत्तसेवा : बहुप्रतीक्षित मुंबई-कोल्हापूर-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस लवकरच धावणार आहे, असे संकेत मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक रामकरण यादव यांनी दिले. त्यामुळे जानेवारीअखेरपर्यंत ही एक्स्प्रेस सुरू होण्याची शक्यता आहे.

पुणे ते मिरज रेल्वे मार्गाचे दुहेरीकरणासह विद्युतीकरण करण्यात येत आहे. सध्या मिरजजवळ इंटरलॉकिंगचे काम सुरू आहे. 12 जानेवारीपर्यंत हे काम चालणार आहे. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक यादव हे या कामाची पाहणी करण्यासाठी आले होते. ते मिरज रेल्वेस्थानकाची पाहणी करीत असताना वंदे भारत एक्स्प्रेस कधी सुरू होणार, अशी विचारणा मिरज रेल्वे कृती समितीच्या सदस्यांनी केली. त्यावेळी यादव यांनी ही माहिती दिली. पुणे-मिरज रेल्वे मार्गाच्या इंटरलॉकिंगचे काम पूर्ण झाल्यानंतर ही रेल्वे सुरू होण्याची शक्यता आहे. याबाबत रेल्वेकडून हालचाली सुरू आहेत. त्यामुळे जानेवारीअखेरपर्यंत मुंबई-कोल्हापूर-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस सुरू होण्याची शक्यता आहे.

Back to top button