सांगली : मौजे डिग्रजच्या शेतकर्‍यास 11 लाख रुपयांचा गंडा | पुढारी

सांगली : मौजे डिग्रजच्या शेतकर्‍यास 11 लाख रुपयांचा गंडा

सांगली : ऊसतोड मजूर पुरविण्याचे आमिष दाखवून मौजे डिग्रज (ता. मिरज) येथील राजगोंडा अण्णा मगदूम या शेतकर्‍याला 11 लाख 20 हजार रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी महिंदा (जि. बीड) येथील देवीदास मोतीराम राठोड याच्याविरुद्ध सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. फसवणुकीचा प्रकार 2021-22 मध्ये घडला.

मगदूम यांच्या शेतातील ऊसतोड करायची होती. यासाठी त्यांनी राठोडला संपर्क केला. त्याने सात पुरुष व सात महिला मजूर पुरविण्यासाठी 11 लाख 20 हजार रुपयांची मागणी केली. मगदूम यांनी त्याला पैसे देऊन लेखी करार केला. मात्र प्रत्यक्षात राठोडने एकही मजूर पुरविला नाही. मगदूम यांनी त्याला मोबाईलवर संपर्क साधून पैसे परत देण्याची मागणी केली. त्याने ‘माझे शेत तुमच्या नावावर करतो’, असे सांगितले. तसेच सुरक्षा हमी म्हणून त्याने कोरे धनादेश सही करून दिले. हे धनादेश मगदूम यांनी बँकेत टाकले. तेही वठले नाहीत. राठोड हा पैसे देण्यास टाळाटाळ करीत असल्याचे लक्षात येताच मगदूम यांनी फिर्याद दिली.

Back to top button