सांगलीचा तत्कालीन शिक्षणाधिकारी विष्णू कांबळेकडे 83 लाखांची बेहिशेबी संपत्ती

सांगलीचा तत्कालीन शिक्षणाधिकारी विष्णू कांबळेकडे 83 लाखांची बेहिशेबी संपत्ती

सांगली; पुढारी वृत्तसेवा : सांगली जिल्हा परिषदेकडील तत्कालीन माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकार्‍याकडे तब्बल 83 लाखांची बेहिशेबी मालमत्ता मिळून आली. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून विष्णू मारुतीराव कांबळे आणि त्याची पत्नी जयश्री विष्णू कांबळे (दोघेही रा. बारबोले प्लॉट, शिवाजीनगर, बार्शी) या दोघांविरुद्ध विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विष्णू कांबळे सांगलीत माध्यमिक विभागाचा शिक्षणाधिकारी असताना त्याने लाच मागितल्याची तक्रार सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दाखल केली होती. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून विष्णू कांबळेला लाच स्वीकारताना 7 मे 2022 रोजी रंगेहाथ पकडले होते.

यावेळी कांबळे याच्या घराची झडती घेतली होती. त्यावेळी त्याच्या घरात दहा लाखांची रोकड मिळून आली होती. याबाबत कागदपत्रे सादर करण्यास लाचलुचपत विभागाने कांबळेला सांगितले होते; परंतु त्याला या रकमेबाबत खुलासा सादर करता आला नव्हता. त्यामुळे लाचलुचपतने त्याच्याविरुद्ध सखोल चौकशी सुरू केली होती. लाचलुचपतने 16 जून 1986 ते 6 मे 2022 दरम्यान कांबळे याने त्याच्या व त्याच्या पत्नीच्या नावे घेतलेल्या संपत्तीची चौकशी करण्यात आली होती. त्यावेळी कांबळे याचे उत्पन्न आणि संपत्तीमध्ये विसंगती आढळून आली होती. मालमत्तेबाबत तो कागदपत्रे सादर करून शकला नव्हता.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news