दिल्लीतील प्रदूषणामुळे जयहिंद महारक्तदान यात्रा लांबणीवर: चंद्रहार पाटील

दिल्लीतील प्रदूषणामुळे जयहिंद महारक्तदान यात्रा लांबणीवर: चंद्रहार पाटील
Published on
Updated on

विटा : पुढारी वृत्तसेवा : दिल्लीच्या प्रदूषित पर्यावरणाचा जयहिंद महारक्तदान यात्रेला फटका बसला आहे. त्यामुळे २६ नोव्हेंबरला दिल्लीत एक हजार जणांचा सशस्त्र सेना आधान केंद्र अर्थात आर्मी हॉस्पिटल येथे होणारे रक्तदान अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आले आहे, अशी माहिती डबल महाराष्ट्र केसरी पै. चंद्रहार पाटील यांनी दिली.

डबल महाराष्ट्र केसरी पै. चंद्रहार पाटील युथ फाउंडेशन मार्फत सांगली जिल्ह्यामध्ये जयहिंद महारक्तदान आयोजित केलेली आहे. यात १ लाख बाटल्या रक्त संकलनाचा उद्देश आहे. तसेच यात दिल्लीतील सशस्त्र सेना आधान केंद्र, (आर्मी हॉस्पिटल) दिल्ली येथे सांगली जिल्ह्यातील एक हजार युवकांसह विशेष रेल्वे जाणार होणार होती. परंतु, दिल्ली येथील जास्तीच्या प्रदूषणामुळे आर्मी रक्तदाता एक्सप्रेसचे नियोजन लांबले आहे. साधारणतः तीन महिन्यापूर्वी पुण्याच्या आर्मी हॉस्पिटलमधून सुरु झालेल्या या यात्रेने खानापूरसह पलूस, आटपाडी आणि जत तालुक्यातील ४० गावांमध्ये भेट दिली आहे.

या महारक्तदान यात्रेचा भाग म्हणून रेल्वेचा स्वतंत्र 'आर्मी रक्तदाता एक्सप्रेस' या नावाने बोगीच बुक केली होती. याचे संपूर्ण नियोजन डबल महाराष्ट्र केसरी पै.चंद्रहार पाटील युथ फाउंडेशनमार्फत करण्यात आले होते. मात्र, सध्या दिल्ली येथील प्रदूषणाची पातळी पाहता हा उपक्रम काही काळ लांबवण्याची विनंती फाउंडेशनला केली आहे.

दिल्ली येथे प्रदूषणाची पातळी शुक्रवारी ४५० एक्यूआई अर्थात हवा गुणवत्ता निर्देशांक इतका गंभीर आहे. त्यामुळे दिल्लीतील प्रशासनामार्फत सर्व स्थानिक शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. तसेच याच परिस्थितीमुळे दिल्लीच्या बाहेरून रक्तदाते आल्यास त्यांच्या आरोग्यास धोक्याचे ठरू शकते, असे दिल्ली येथील अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. आधीच थंडी आणि कमालीचे प्रदूषणामुळे दिल्लीतील रक्तदानच पुढे ढकलल्याची माहिती चंद्रहार पाटील यांनी दिली.

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news