सांगली : मुढेवाडी ग्रामपंचायत निवडणुकीत बिनविरोधची परंपरा कायम; उज्वला ऐवळे यांची सरपंचपदी निवड | पुढारी

सांगली : मुढेवाडी ग्रामपंचायत निवडणुकीत बिनविरोधची परंपरा कायम; उज्वला ऐवळे यांची सरपंचपदी निवड

आटपाडी, पुढारी वृत्तसेवा : आटपाडी तालुक्यातील मुढेवाडी ग्रामपंचायतने बिनविरोध निवडणुकीची परंपरा कायम राखली. ग्रामपंचायत स्थापना झाल्यापासून सलग सातव्यांदा ही ग्रामपंचायत ही बिनविरोध झाली. ग्रामपंचायत निवडणुक बिनविरोध करण्यासाठी ग्रामस्थांनी बैठक घेत समन्वयाने सात सदस्य बिनविरोध केले.

सरपंचपदासाठी मात्र चुरस होती. या समस्येवर ग्रामस्थांनी चर्चा करून एक नांव निश्चित केले. आज अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी सरपंचपदासाठी देखील एकच अर्ज शिल्लक राहिल्याने ग्रामपंचायत बिनविरोध झाली. मुढेवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी उज्वला बाबासो यांची बिनविरोध निवड झाली.  सदस्य म्हणून निवड झालेले लोक – हिंदुराव दगडू मुढे, सतीश विलास अनुसे, काशिनाथ आबा मुढे, माया किसन मुढे,संगीता मधुकर खोत, रसवंता हणमंत मुढे, कांताबाई विलास मुढे

निकालानंतर सरपंच उज्वला ऐवळे यांनी सर्व सदस्यांच्या सहकार्याने विकासाला चालना देण्याची ग्वाही दिली.

हेही वाचंलत का?

Back to top button