भूकंप : चांदोली परिसराला भूकंपाचा धक्का | पुढारी

भूकंप : चांदोली परिसराला भूकंपाचा धक्का

वारणावती ; पुढारी वृत्तसेवा

चांदोली परिसर आज (सोमवार) पहाटे 2 वाजून 36 मिनिटांच्या सुमारास भूकंपाच्या धक्क्याने हादरला. वारणावती येथील भूकंपमापन केंद्रावर त्याची तीव्रता रिश्‍टर स्केलवर 3.2  इतकी नोंदली गेली. रात्रीची वेळ व धक्काही सौम्य स्वरूपाचा असल्यामुळे परिसरात तो चांगलाच जाणवला.

भूकंपाचा केंद्रबिंदू वारणावती पासून 18.4 किलोमीटर अंतरावर असल्याचे येथील भूकंपमापन केंद्राकडून सांगण्यात आले.
दरम्यान 24 ऑक्टोबर रोजी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास चांदोली परिसराला भूकंपाचा धक्का बसला होता. त्याची तीव्रता 2.9 रिश्टर इतकी नोंदली गेली होती.

आज 20 दिवसानंतर पुन्हा त्यापेक्षा अधिक तीव्रतेचा धक्का चांदोली परिसराला बसला आहे. वारंवार बसणाऱ्या या धक्क्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. या भूकंपाच्या धक्क्यामुळे कोणतीही जीवित वा वित्तहानी झाली नसून धरण सुरक्षित असल्याचा निर्वाळा धरण प्रशासनाने दिला आहे.

Back to top button