Goa National Games 2023: राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत ६७ सुवर्ण पदकासह महाराष्ट्र अव्वलस्थानी | पुढारी

Goa National Games 2023: राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत ६७ सुवर्ण पदकासह महाराष्ट्र अव्वलस्थानी

पणजी: पुढारी वृत्तसेवा : गोव्यात सुरू असलेल्या ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राने आतापर्यंत ६७ सुवर्ण पदकासह १९३ पदके पटकावली आहेत. पदकतालिकेत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. सेना दलाची मक्तेदारी मोडीत काढली आहे, अशी माहिती महाराष्ट्र ऑलंपिक संघटनेचे महासचिव नामदेव शिरगावकर यांनी आज (दि.५) पत्रकार परिषदेत दिली.  Goa National Games 2023

सुवर्णपदक विजेत्याला ७ लाख, रौप्य पदक विजेत्याला ५ लाख आणि कास्यपदक विजेत्याला ३ लाख बक्षिस म्हणून देण्यात येणार आहे.
यावेळी क्रीडा खात्याचे उपसचिव सुनील हांजे, ऑलंपिक संघटना खजिनदार धनंजय भोसले, महाराष्ट्र पथक प्रमुख स्मिता शिरोळे, रणजित रणशिंगे, नवनाथ फडतरे आदी उपस्थित होते. राज्य सरकार व ऑलंपिक संघटना यांचे सयुक्तिक प्रयत्न फळाला आले. Goa National Games 2023

हेही वाचा 

Back to top button