सांगली : अर्ज माघारीनंतर २५ ग्रामपंचायती बिनविरोध | पुढारी

सांगली : अर्ज माघारीनंतर २५ ग्रामपंचायती बिनविरोध

सांगली; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील ९४ ग्रामपंचायती आणि २२ ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीसाठी अर्ज माघारीच्या आजच्या शेवटच्या दिवसानंतर १ हजार ५२६ जण सदस्य पदाच्या निवडणुकीच्या रिंगणात राहिले असून, सरपंच पदासाठी २२० जण निवडणुकीच्या रिंगणात राहिले आहेत. अर्ज माघारीनंतर २५ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असून, १६६ सदस्य आणि १३ सरपंच बिनविरोध निवडूण आले आहेत.

एकूण ९४ ग्रामपंचायतीच्या ८२२ पोटनिवडणुकीच्या २२ ग्रामपंचायतीमधील २८ सदस्यासाठी व ९७ सरपंचपदासाठी निवडणूक होत आहे. अर्ज माघारीचा बुधवारचा शेवटचा दिवस होता. अनेक ठिकाणी चर्चा लांबल्याने अर्ज माघारीसाठी मुदतवाढ देण्यात आली होती.
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत २ हजार ९९० जणांनी उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. त्याचबरोबर सरपंच पदाच्या ९७ जागेसाठी ५१९ जणांनी अर्ज भरले होते.

अर्ज माघारीनंतर ८४ ग्रामपंचायतीसाठी सार्वत्रिक १५०५ सदस्य तर पोटनिवडणुकीसाठी २१ व सरपंचपदासाठी २१८ व पोटनिवडणुकीसाठी २ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात राहिले आहेत. एकूण १ हजार ५२६ जण सदस्य तर सरपंच पदासाठी २२० जण निवडणुकीच्या रिंगणात राहिले आहेत. आता ५ नोव्हेंबरला मतदान होत असून, ६ नोव्हेंबरला मतमोजणी होत आहे. आता गुरुवारपासून प्रचाराचा धुरळा उडणार आहे.

Back to top button