विटा: पुढारी वृत्तसेवा : सातारा जिल्ह्यातील कृष्णा प्रकल्पाच्या फेर जलनियोजनासह बोंडारवाडी प्रकल्पाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली. या प्रकल्पासाठी शिवसेना आमदार अनिलराव बाबर यांनी पाठपुरावा केला होता. अखेर त्यांच्या प्रयत्नाला यश मिळाले आहे. (MLA Anil Babar)
सातारा जिल्ह्यातील कृष्णा प्रकल्पाच्या फेर जलनियोजनासह जावळी तालुक्यातील बोंडारवाडी प्रकल्पाला मंजुरीसाठी आमदार अनिल बाबर सातत्याने पाठपुरावा करत होते. अखेरीस ३० सप्टेंबररोजी सुधारित शासन निर्णय जाहीर झाला. या शासन निर्णयाची प्रत आमदार अनिल बाबर यांना नुकतीच मिळाली. आमदार बाबर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा निवासस्थानी भेटू घेतली, त्यावेळी ही प्रत सुपूर्द केली. तसेच त्यांची दुसरी महत्त्वाची मागणी असलेल्या टेंभू योजनेच्या तिसऱ्या सुधारित प्रशासकीय मान्यतेचा प्रस्तावही लवकरच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी आमदार बाबर यांना सांगितले. (MLA Anil Babar)
खानापूर, आटपाडी व तासगाव तालुक्यातील विसापूर मंडलातील ३४ गावातील शेतकऱ्यांना टेंभू योजनेचे हक्काचे पाणी मिळावे, यासाठी आमदार बाबर यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. टेंभू विस्तारीत योजनेसाठी ८ टीएमसी पाणी उपलब्ध करुन देण्यास राज्य शासनाने मंजुरी दिल्यामुळे या भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
हेही वाचा