sangli News : दुधारीत मिरवणुकीत तरुणाचा मृत्यू | पुढारी

sangli News : दुधारीत मिरवणुकीत तरुणाचा मृत्यू

बोरगाव; पुढारी वृत्तसेवा :  दुधारी (ता. वाळवा) येथील गणेश मंडळाचा कार्यकर्ता प्रवीण यशवंत शिरतोडे (वय 35) याचा विसर्जन मिरवणुकीदरम्यान चक्कर येवून पडून मृत्यू झाला. डीजेच्या दणक्याने त्याचा मृत्यू झाल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.

प्रवीण यशवंत शिरतोडे हा सेंट्रिंग कर्मचारी आहे. सोमवारी तो दिवसभर सेंट्रिंग काम करत होता. कामावरून घरी तो परतत असताना त्याची दुचाकी पंक्चर झाली. ही दुचाकी ढकलत तो दोन किलोमीटर असणार्‍या त्याच्या घरापर्यंत आला. यावेळीच त्याची दमछाक झाली. प्रवीण यांनी गाडी घरासमोर लावली. दरम्यान, तोे मंडळाच्या सुरू असलेल्या विसर्जन मिरवणुकीत सामील झाला. मिरवणुकीचा जल्लोष सुरू होता.त्यात सामील होऊन तो नाचत असताना चक्कर येऊन खाली कोसळला. त्याला मंडळातील कार्यकर्त्यांनी इस्लामपूर येथील रुग्णालयात दाखल केले. परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्याच्या पश्चात आई-वडील, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. मंगळवारी दुधारी येथे त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.कष्टाळू प्रवीणच्या मृत्यूने परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

Back to top button