सांगली – मराठा समाजातर्फे बंदला प्रतिसाद | पुढारी

सांगली - मराठा समाजातर्फे बंदला प्रतिसाद

सांगली – पुढारी वृत्तसेवा – मराठा समाजाला आरक्षण मिळावे, जालना येथे झालेला लाठी हल्ला व गोळीबार प्रकरणी दोषीवर कारवाई करावी, यासह विविध मागण्यांसाठी सांगली, मिरज शहरासह जिल्हा बंद, रास्ता रोकोचे आयोजन केले आहे. त्याला सकाळपासूनच प्रतिसाद मिळत आहे.

जालना येथे मराठा आरक्षण प्रश्न सुरू असलेल्या आंदोलनाच्या ठिकाणी पोलिसांनी लाठीहल्ला करीत, अश्रूधुराचा वापर केला. त्याचे तीव्र पडसाद राज्यभर उमटत आहेत. सांगलीसह जिल्ह्यातही त्याचे जोरदार पडसाद उमटले. तालुक्याच्या ठिकाणासह गावागावात बंद, मोर्चे होत आहेत. सांगलीतही बंद ठेवण्याचा निर्णय मंगळवारी येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आला. त्याप्रमाणे नियोजन करण्यात आलेले आहे. मराठा क्रांतीमोर्चातर्फे बंदमध्ये सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आलेले आहे.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चातर्फे आतापर्यंत शांततेच्या मार्गाने आंदोलने झालेली आहेत. आताचेही आंदोलन शांततेच्या व सनदशील मार्गाने करण्यात यावे, असे आवाहन मराठा सेवा संघाचे अध्यक्ष डॉ. संजय पाटील यांनी केले आहे.

Back to top button