सांगली : दहावी, बारावी परीक्षा केंद्र परिसरात बंदी आदेश | पुढारी

सांगली : दहावी, बारावी परीक्षा केंद्र परिसरात बंदी आदेश

सांगली; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात 18 जुलै ते 8 ऑगस्ट या कालावधीत दहावी आणि बारावी परीक्षा घेण्यात येणार आहे. परीक्षा केंद्राच्या ठिकाणी शांतता व सुव्यवस्था राखण्याच्यादृष्टीने जिल्हादंडाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी केंद्राच्या 100 मीटर परिसरात सकाळी 9 ते सायंकाळी 6 पर्यंत बंदी आदेश लागूृ केला आहे.

दहावीसाठी अकरा परीक्षा केंद्रे असून, ती अशी- सांगली हायस्कूल, वखारभाग, सांगली, विद्यामंदिर प्रशाला, ब्राम्हणपुरी, मिरज, कन्या शाळा, शिराळा, महात्मा गांधी माध्यमिक विद्यालय, आष्टा, विद्यामंदिर हायस्कूल, इस्लामपूर, श्री. रामराव विद्यामंदिर हायस्कूल जत, श्री महांकाली हायस्कूल कवठेमहांकाळ, श्री भवानी विद्यालय आटपाडी, स्वामी रामानंद भारती विद्यामंदिर तासगाव, विटा हायस्कूल विटा, लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्यामंदिर पलूस. बारावीची परीक्षा केंद्रे : विलिंग्डन महाविद्यालय, विश्रामबाग., शि.म. डॉ. बापुजी साळुंखे महाविद्यालय, मिरज, विश्वासराव नाईक महाविद्यालय, शिराळा, आर्टस अ‍ॅन्ड कॉमर्स कॉलेज, आष्टा, कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज, इस्लामपूर, के. एम. हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, जत, पद्मभूषण डॉ. वसंतरावदादा पाटील महाविद्यालय, कवठेमहांकाळ, पद्मभूषण डॉ. वसंतरावदादा पाटील महाविद्यालय, तासगाव, आर्टस, सायन्स अँड कॉमर्स कॉलेज, रामानंदनगर, ता. पलूस.

Back to top button