विसापुरात चारचाकीसह दोन मोटारसायकली पेटविल्या | पुढारी

विसापुरात चारचाकीसह दोन मोटारसायकली पेटविल्या

तासगाव, पुढारी वृत्तसेवा : विसापूर (ता. तासगाव) येथील उपसरपंच अशोक एकनाथ अमृतसागर यांची एक चारचाकी व दोन दुचाकी कोणीतरी अज्ञाताने पेटवून दिल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी अशोक अमृतसागर यांनी तासगाव पोलिसात अज्ञाताचे विरोधात फिर्याद दाखल केली आहे. हा प्रकार बुधवारी रात्री उशिरा घडला आहे.

याबाबत पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी : फिर्यादी अमृतसागर यांनी त्यांच्या घरासमोर असणार्‍या पत्र्याचे शेडमध्ये त्यांची चारचाकी (एम एच 14, 3098) दुचाकी (एम एच 10 बी यु 8694) व दुचाकी (एम एच 10 ए 9235) उभ्या केल्या होत्या. बुधवारी रात्री दोन वाजता अमृतसागर हे जागे झाले व ते घराच्या बाहेर आले असता त्यांना तिन्ही वाहनांनी पेट घेतला असल्याचे आढळून आले. याची माहिती अमृतसागर यांनी त्यांच्या भावास देऊन त्यांना बोलावून घेतले. त्यांची पाण्याची मोटार सुरू करून पेटलेल्या वाहनांची आग आटोक्यात आणली.

दरम्यान, अमृतसागर हे विसापूर गावचे विद्यमान उपसरपंच आहेत. ही घटना राजकीय वैमनस्यातून घडली असण्याची घटनास्थळी चर्चा सुरू होती.

Back to top button