सांगली : ग्रामविकास अधिकारी जाधव, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक मुल्ला निलंबित

सांगली : ग्रामविकास अधिकारी जाधव, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक मुल्ला निलंबित

सांगली; पुढारी वृत्तसेवा :  कवठेमहांकाळ पंचायत समितीचा स्थापत्य अभियांत्रिकी सहायक अजित मुबारक मुल्ला आणि तासगाव तालुक्यातील मणेराजुरी येथील ग्रामविकास अधिकारी महादेव विठ्ठल जाधव यांना निलंबित करण्यात आले आहेत. तसे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.

काही दिवसापूर्वी घरकुलचे बांधकाम करण्यासाठी मंजूर निधीतील हप्ता जमा करण्यासाठी लाच स्वीकारताना मुल्ला सापडले होते. तसेच जाधव यांनीही घरकुलासाठी पैशाची मागणी केली होती. पोलिसांकडून दोघांचाही अहवाल जिल्हा परिषदेला मिळाला आहे. पोलिसांकडून आलेल्या अहवालानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी मुल्ला यांना निलंबित केले आहे. याप्रकरणी विभागीय आयुक्तांकडून सखोल चौकशी करून पुढील कारवाई होणार आहे. तसेच मणेराजुरी (ता. तासगाव) येथील ग्रामविकास अधिकारी जाधव यांना गटविकास अधिकारी यांनी निलंबित केले आहे. जाधव यांची खातेनिहाय चौकशी करून पुढील कारवाई विभागीय आयुक्तांकडून करण्यात येणार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news