नालसाब मुल्ला खून प्रकरण : सचिन डोंगरेला 2 जुलैपर्यंत कोठडी | पुढारी

नालसाब मुल्ला खून प्रकरण : सचिन डोंगरेला 2 जुलैपर्यंत कोठडी

सांगली; पुढारी वृत्तसेवा :  राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता आणि बाबा ग्रुपचा प्रमुख नालसाब मुल्ला याच्या खून प्रकरणी अटकेत असलेल्या मुख्य सूत्रधार सचिन डोंगरेला दि. 2 जुलैपर्यंत पोलिस कोठडी ठोठाविण्यात आली. याबाबत महिती अशी की, नालसाब मुल्ला याच्या खून प्रकरणी मुख्य सूत्रधार सचिन डोंगरे याला शनिवारी विश्रामबाग पोलिसांनी कळंबा कारागृहातून अटक केली आहे. त्याला रविवारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला दि. 2 जुलैपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

सचिन डोंगरे याने कळंबा कारागृहातून 22 मोबाईल कॉल करून खुनाची सूत्रे हलविल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले. त्यासाठी त्याने चायनामेड मोबाईलचा वापर केला होता. हल्लेखोरांसह अन्य गुन्हेगारांच्या तो संपर्कात असल्याचे तपासात समोर आले आहे. जामीन मिळू नये यासाठी नालसाब मुल्ला प्रयत्न करीत असल्याने सचिन डोंगरे याने थेट कारागृहातूनच त्याचा काटा काढल्याचे आतापर्यंतच्या पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. यासाठी तो अनेक गुन्हेगारांच्या संपर्कात होता. त्याला कारागृहात मोबाईल कोणी पुरविले, याचा देखील पोलिस तपास करीत आहेत. या खून प्रकरणी पोलिसांनी यापूर्वी सनी कुरणे, विशाल कोळपे, स्वप्निल मलमे, रोहित मंडले, प्रशांत उर्फ बबलू चव्हाण, ऋत्विक माने या संशयितांना अटक करण्यात आली होती.

Back to top button