सांगली : 86 ग्रा. पं. निवडणूक आरक्षण सोडत

सांगली : 86 ग्रा. पं. निवडणूक आरक्षण सोडत
Published on
Updated on

सांगली; पुढारी वृत्तसेवा :  राज्य निवडणूक आयोगाने जिल्ह्यातील 86 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूक आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार ग्रामपंचायतीचे प्रभाग निहाय आरक्षणाचे प्रारूप, नमूना ब दि. 26 जूनरोजी सर्व ग्रामपंचायत, तलाठी कार्यालय, गट विकास अधिकारी कार्यालय व तहसिल कार्यालय स्तरावर तसेच वेब साईटवर प्रसिद्ध करण्यात येत आहे.

प्रभाग निहाय आरक्षण निश्चिती प्रारूप, नमुना ब बाबत हरकती व सुचना, संबधीत तहसीलदार यांच्याकडे कार्यालयीन वेळेत 27 जून ते 03 जुलै या कालावधीमध्ये दाखल करता येणार आहेत. हरकतींवर संबंधित उपविभागीय स्तरावर 7 जुलै रोजी अभिप्राय घेण्यात येवून त्यास 12 जुलैरोजी जिल्हाधिकारी यांच्या स्तरावर मान्यता देवून 14 जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती प्रभारी उपजिल्हाधिकारी (महसूल) डॉ. विकास खरात यांनी दिली.

आरक्षण सोडत जाहीर केलेल्या तालुकानिहाय ग्रामपंचायती अशा

मिरज – का. खोतवाडी, निलजी, बामणी, वाजेगाव. तासगाव – चिखलगोठण, बिरणवाडी. जत – गुलगुंजनाळ, को. बोबलाद, कोणबर्गी, बिळूर, खिलारवाडी. कवठेमहांकाळ – बसाप्पाचीवाडी, दुधेभावी, गर्जेवाडी, करलहट्टी, पिंपळवाडी, रामपूरवाडी, देशिंग, धुळगाव, घोरपडी, करोली टी, कोकळे, शिंदेवाडी (जी), ढोलेवाडी, ढालगाव, कदमवाडी, कुंडलापूर, मोरगाव, जाधववाडी, झुरेवाडी. खानापूर-विटा – देवनगर, भेंडवडे, साळशिंगे. आटपाडी – नेलकरंजी, वाक्षेवाडी, काळेवाडी, मानेवाडी, मासाळवाडी, मिटकी, पिंपरी खुर्द, आंबेवाडी, बनपुरी, करगणी, मुढेवाडी, निंबवडे, पूजारवाडी आ., विभूतवाडी, औटेवाडी, कानकात्रेवाडी. पलूस – राडेवाडी, आमणापूर, विठ्ठलवाडी. वाळवा – तांबवे, शिरटे, साटपेवाडी, कारंदवाडी. कडेगाव – वाजेगाव, चिंचणी वांगी. शिराळा – बांबवडे, वाकुर्डे बु., भाटशिरगाव, धसवाडी, करुगली, खुजगांव, मादळगाव, रांजणवाडी, रिळे, शिरशी, आंबेवाडी, बेलेवाडी, फकीरवाडी, खराळे, कुसाईवाडी, सावंतवाडी, शिरसटवाडी, चिखलवाडी, अस्वलेवाडी, चिंचेवाडी, इंगरूळ, कुसळेवाडी, मराठेवाडी, मेणी, मोरेवाडी, पं.त. वारूण, पाचगणी, मानेवाडी, कदमवाडी.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news