सांगलीत रविवारी नेमिनाथनगरच्या मैदानावर काँग्रेसचा महानिर्धार मेळावा झाला. यास जिल्ह्यातील हजारो कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, माजी राज्यमंत्री व संयोजक आ. डॉ. विश्वजित कदम, ज्येष्ठ नेते आ. मोहनराव कदम, आ. विक्रम सावंत, माजी मंत्री आ. सतेज पाटील, प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, कर्नाटकचे उद्योगमंत्री एम. बी. पाटील, आमदार प्रणिती शिंदे आदी प्रमुख उपस्थित होते. यावेळी सिद्धरामय्या यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.